श्रीराम, गरूड रथोत्सवाला २४६ वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:22 IST2018-03-27T01:22:07+5:302018-03-27T01:22:07+5:30

नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळख असलेल्या प्रभू श्रीराम व गरुड रथोत्सवाला २४६ वर्षांची परंपरा आहे. सवाई माधवराव पेशवे एकदा आजारी पडल्याने त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला नवस केला. बरे वाटल्यानंतर पेशवे यांनी प्रभू रामाला रामरथ अर्पण केला. या रथाच्या देखभालीची जबाबदारी पेशवे यांनी त्यांचे मामा सरदार रास्ते यांच्याकडे सोपविली.

Shriram, Garud Rathotswala 246 years old tradition | श्रीराम, गरूड रथोत्सवाला २४६ वर्षांची परंपरा

श्रीराम, गरूड रथोत्सवाला २४६ वर्षांची परंपरा

संदीप झिरवाळ ।
पंचवटी : नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळख असलेल्या प्रभू श्रीराम व गरुड रथोत्सवाला २४६ वर्षांची परंपरा आहे. सवाई माधवराव पेशवे एकदा आजारी पडल्याने त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला नवस केला. बरे वाटल्यानंतर पेशवे यांनी प्रभू रामाला रामरथ अर्पण केला. या रथाच्या देखभालीची जबाबदारी पेशवे यांनी त्यांचे मामा सरदार रास्ते यांच्याकडेसोपविली. रास्ते यांनी त्यावेळी तरुण मंडळी एकत्र यावी यासाठी रास्ते आखाडा तालीम संघाची स्थापना करत व्यायामप्रेमी व पहिलवान घडविले आणि नंतर हेच पहिलवान पुढे रथोत्सवात रथ ओढण्याचे काम करू लागल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली आणि तेव्हापासून आजता गायत सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडे श्रीराम रथाची जबाबदारी आहे. पूर्वीच्या काळी रस्ते नसल्याने खडतर मार्गानेच रथ ओढला जायचा. एकदा रथोत्सवाच्या दिवशी रथ वाघाडी नाल्यातील चिखलात फसला. त्यावेळी पाथरवट समाजाच्या काही युवा कार्यकर्त्यांनी चिखलात रूतलेला रथ सुखरूपपणे बाहेर काढल्याने तेव्हापासून रामाच्या रथाची धुरा वाहण्याचा मान समस्त पाथरवट समाजाकडे दिला आहे. श्रीराम रथाचे मानकरी हे सरदार रास्ते आखाडा तालीम संघाचे पदाधिकारी आहेत तर गरुड रथाचा मान अहल्याराम व्यायाम शाळेकडे आहे. रथोत्सवाचे मुख्य मानकरी हे बुवा असतात. यंदा पुष्करराजबुवा हे मानकरी असून, बुवा रथोत्सवाच्या मानकऱ्यांना मानाचा गंध लावून सत्कार करतात. श्रीरामाचा रथ हा पूर्णपणे सागवानी लाकडापासून तयार केलेला आहे. पंधरवड्यापूर्वी श्रीरामाच्या रथाचे उजवे चाक बदलण्यात आले. सांगली येथील कारागिराने हे चाक बनविले तर पाथरवट समाजाच्या एका भाविकाने पुढाकार घेत रथाच्या चाकासाठी आलेल्या ७० हजार रुपये खर्चाची जबाबदारी पेलली. १७७२ पासून रथोत्सवाची परंपरा असून दरवर्षी श्रीरामन वमीनंतर  दोन दिवसांनी येणाºया कामदा एकादशीला हा रथोत्सव साजरा केला जातो. काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून निघणाºया या रथोत्सव यात्रेत तमाम नाशिककर मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.
बुवांचे रथाभिमुख दिशेने मार्गक्रमण
रथोत्सवाच्या दिवशी रथाचे मानकरी असलेले बुवा हे दोन्ही रथांकडे तोंड करून उलट्या दिशेने रथोत्सव मार्गावर मार्गक्रमण करत असतात. दरवर्षी पुजारी कुटुंबीयातील सदस्यांना हा मान मिळत असतो. रथोत्सवाच्या आदल्या दिवशी मालविय चौकातून रथ राममंदिराकडे नेला जातो. पाथरवट समाजाच्या वतीने रथोत्सवाचे स्वागत म्हणून शिवाजी चौक, पाथरवट लेन, गजानन चौक परिसरात आकर्षक कमान उभारून तसेच विद्युत रोषणाई करून गुढ्या उभारून आदल्या दिवशी रथयात्रेचे जल्लोषात स्वागत केले जाते. रथोत्स वापूर्वी श्रीराम व गरुड रथांना रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाईचे काम केले जाते. श्रीराम रथापुढे गरुड रथ आकाराने लहान आहे. रथोत्सवाची तयारी पूर्ण झाल्यानंतर आदल्या दिवशी रथांची चाके, धुरी, तसेच ब्रेक तपासणी करून चाकांना वंगण लावण्याचे काम केले जाते.

Web Title: Shriram, Garud Rathotswala 246 years old tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.