श्री संप्रदायाचा पारायण सोहळा
By Admin | Updated: July 30, 2014 00:21 IST2014-07-29T22:21:58+5:302014-07-30T00:21:27+5:30
श्री संप्रदायाचा पारायण सोहळा

श्री संप्रदायाचा पारायण सोहळा
सिन्नर : रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या श्री संप्रदायाच्या तालुका सेवा समितीच्या वतीने आयोजित लीलामृत ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात पार पडला.
येथील शुभंकरोती मंगल कार्यालयात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पारायण सोहळ्याच्या सांगता कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष श्रीमती अश्विनी देशमुख, अॅड. अण्णासाहेब सोनवणे, अॅड. शिवराज नवले, सेवा समितीचे जिल्हा सचिव जालिंदर थोरात, अध्यात्मिक विभाग प्रमुख राजेंद्र भालेराव आदि उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नरेंद्राचार्य महाराजलिखित २१ अध्याय असलेल्या लीलामृत ग्रंथाचा एक दिवसाचा पारायण आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात तालुक्यातील शेकडो महिला व पुरुष भाविकांनी सहभाग घेतला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. सेवा समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. आरती व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी तालुका सेवा समितीचे शरद वराडे, महिला तालुका सेवाध्यक्ष शांताबाई आव्हाड, प्रसिद्धीप्रमुख उत्तम बिडगर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)