प्रभु श्री रामचंद्रांच्या जयघोषात नाशिकमध्ये श्रीराम जन्मोत्सव उत्साहात
By संजय पाठक | Updated: March 30, 2023 16:07 IST2023-03-30T16:07:12+5:302023-03-30T16:07:25+5:30
ढोल ताशांच्या गजरात दुपारी ठीक बारा वाजता मंदिराच्या गाभाऱ्यातील पडदे हटवताच एकच जल्लेाष झाला. त्यानंतर महाआरती करण्यात आली आणि पंजीरीचा प्रसाद देण्यात आला.

प्रभु श्री रामचंद्रांच्या जयघोषात नाशिकमध्ये श्रीराम जन्मोत्सव उत्साहात
नाशिक- सियावर राम चंद्र की जय, जय सिता राम सिताच्या जय घोषात रामभूमी नाशिकमध्ये प्रभु श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव आज दुपारी बारा वाजता उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिकमधील पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात झालेल्या या जन्मोत्सवाला रामभक्तांनी प्रचंड गर्दी केली हेाती. परीसरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच रामजन्माचा देखावा तयार करण्यात आला हाेता.
ढोल ताशांच्या गजरात दुपारी ठीक बारा वाजता मंदिराच्या गाभाऱ्यातील पडदे हटवताच एकच जल्लेाष झाला. त्यानंतर महाआरती करण्यात आली आणि पंजीरीचा प्रसाद देण्यात आला. महिलांनी पाळण्यात बालक अवस्थेतील रामाची मूर्ती ठेवून पाळणा गीते म्हंटली. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे उपस्थित होते. दरम्यान, नाशिकमध्येच श्री गोराराम, भोसला सैनिकी शाळेत बंदुकीच्या गोळ्यांपासून तयार करण्यात आलेला कोदंडधारी राम अशा विविध राम मंदिरांमध्ये रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.