शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
2
रशियानं बदला घेतला, युक्रेन जबरदस्त हादरला! ४०० हून अधिक ड्रोन अन् ४० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा कहर, झेलेन्स्की संतापले
3
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
4
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन दिले...
5
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
6
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
7
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
8
तिसऱ्या मुलासाठी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
9
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
10
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
11
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
12
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
13
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
14
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
15
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
16
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
17
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
18
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
19
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
20
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

आडगावला श्री दगडोजी महाराज यात्रोत्सव

By admin | Updated: January 23, 2016 23:23 IST

सवाद्य मिरवणूक : विविध धार्मिक कार्यक्रम

पंचवटी : आडगाव येथील श्री दगडोजी महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे श्री दगडोजी महाराज यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रोत्सवानिमित्ताने श्री दगडोजी महाराज मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक मीना माळोदे यांच्या हस्ते दगडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. शिंदे गल्ली येथून निघालेली मिरवणूक आडगाव मेनरोड, बसस्टॅँड आदि परिसरांतून काढण्यात येऊन श्री दगडोजी महाराज मंदिराजवळ समारोप करण्यात आला. फुलांनी सजविलेल्या चित्ररथात दगडोजी महाराज यांचा चांदीचा मुखवटा ठेवण्यात आला होता. आडगावचे जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या दगडोजी महाराज मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. दगडोजी महाराज यात्रोत्सवानिमित्ताने पूजा साहित्य तसेच विविध खेळणी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. श्री दगडोजी महाराज यात्रोत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष भिकाजी शिंदे, सुभाष मते, माणिकराव शिंदे, बाळासाहेब लभडे, रामभाऊ जाधव, अंबादास मवाळ, गोरखनाथ माळोदे, दत्तू हळदे आदिंसह यात्रोत्सव समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या यात्रोत्सवानिमित्ताने येत्या मंगळवारी दुपारी आडगाव व्यायामशाळेच्या पटांगणावर कुस्त्यांची दंगल होणार असून, यातील विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे तसेच गुरुवारी लोककलेचा कार्यक्रम होणार आहे. (वार्ताहर)