श्री काळाराम संस्थान : धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

By Admin | Updated: March 16, 2015 00:50 IST2015-03-16T00:50:28+5:302015-03-16T00:50:37+5:30

वासंतिक नवरात्र महोत्सव २१ पासून

Shri Kalaram Institute: The Culture of Religious, Cultural Programs | श्री काळाराम संस्थान : धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

श्री काळाराम संस्थान : धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

नाशिक : येथील श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा येत्या २१ ते ३१ मार्चदरम्यान वासंतिक नवरात्र महोत्सवाचे (श्रीराम जन्मोत्सव) आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानांची पर्वणी लाभणार आहे.
दि. २१ रोजी सायंकाळी ५ वाजता काळाराम मंदिरात फुलगाव येथील स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद करंजकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रात्री ८ वाजता मंगेश बोरगावकर यांचा ‘गाणे मंगेशाचे’ हा कार्यक्रम, दि. २२ रोजी ‘तालचक्र’ हा १७५ विद्यार्थ्यांच्या तबलावादनाचा कार्यक्रम व राहुल देशपांडे यांचे गायन, दि. २३ रोजी उत्तम कांबळे यांचे ‘फिरस्तीत भेटलेली माणसं’ विषयावर व्याख्यान व आशिष रानडे यांचा ‘संतवाणी’ हा कार्यक्रम, दि. २४ रोजी तुळशीराम गुट्टे यांचे ‘मानवी मनाचा आरसा : राम’ या विषयावर व्याख्यान व रसिका जानोरकर यांचा ‘स्वरमाला’ कार्यक्रम, दि. २५ रोजी संजय गोडबोले यांचे ‘वैश्विक प्रार्थना : पसायदान’ विषयावर व्याख्यान व जीवन धर्माधिकारी (पुणे) यांची अभंग गायनाची मैफल, दि. २६ रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसाद व रात्री पं. हृदयनाथ व राधा मंगेशकर यांचा ‘भावसरगम’ कार्यक्रम, दि. २७ रोजी शेखर मुजुमदार यांचे ‘सुजाण पालकत्व’ विषयावर व्याख्यान व विष्णू संगीत विद्यालयाचा ‘भावसरगम’ कार्यक्रम, दि. २८ रोजी दुपारी १२ वाजता श्रीरामनवमी जन्मोत्सव, दि. २९ रोजी डॉ. धनंजय चौधरी यांचे ‘शिवाजी महाराज’ विषयावर व्याख्यान व मीनल जोशी-शाह यांची ‘संपूर्ण रामायण नृत्यनाटिका’, दि. ३० रोजी आशा कुलकर्णी यांचे ‘श्रीरामरक्षेचे जीवनातील महत्त्व’ विषयावर व्याख्यान व विवेक केळकर यांचा ‘गीतरामायण’ कार्यक्रम, तर ३१ रोजी श्रीराम रथयात्रा असे कार्यक्रम होणार आहेत. रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shri Kalaram Institute: The Culture of Religious, Cultural Programs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.