शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:56 AM

ढोल-ताशांचा गजर, लेजीमचा ठेका, पारंपरिक पेहरावांवर रंगीबेरंगी फेट्यांनी वाढवलेली शोभा आणि त्यात वरुणराजाने अलगदपणे सुरू केलेल्या जलाभिषेकात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. उपनगरांमध्येही श्रींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

नाशिक : ढोल-ताशांचा गजर, लेजीमचा ठेका, पारंपरिक पेहरावांवर रंगीबेरंगी फेट्यांनी वाढवलेली शोभा आणि त्यात वरुणराजाने अलगदपणे सुरू केलेल्या जलाभिषेकात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. उपनगरांमध्येही श्रींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.मुख्य विसर्जन मिरवणुकीला दुपारी १२.३०च्या सुमारास रिमझिम पावसातच प्रारंभ झाला. शहराच्या प्रथम नागरिक महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून औपचारिक प्रारंभ करण्यात आला. या विसर्जन मिरवणुकीप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, वसंत गिते, विजय साने, लक्ष्मण सावजी, गजानन शेलार, हरिभाऊ लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात मान्यवरांनी धरलेला फेर आणि बालगोपाळांनी लेजीमच्या ठेक्यावर केलेल्या लयबद्ध पदन्यासाने लक्ष वेधून घेतले.शहरात सर्वत्र बाप्पाला निरोप देण्यासाठी लगबग सकाळपासून दिसून येत होती. लाडक्या बाप्पांना निरोप दिला जात असताना वरुण राजानेदेखील गणरायावर जलाभिषेकाची संततधार धरल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला अधिकच बहर आला होता. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत होती. अखेरीस ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा भावपूर्ण निरोप देत गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.मानाच्या पाच गणरायांनंतर क्रमांक मिळवण्यासाठी लगबगसार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाच्या अग्रभागी नाशिक महापालिका कर्मचारी गणेशोत्सव समितीचा गणपती आणि त्यापाठीमागे रविवार कारंजा मित्रमंडळ, भद्रकाली कारंजा मित्रमंडळाचा श्रीमंत साक्षी गणेश, गुलालवाडी व्यायामशाळा मित्रमंडळ, श्रीमान सत्यवादी मित्रमंडळाची भव्यमूर्ती, सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळाचा नाशिकचा राजा, सरदार चौक मित्रमंडळ, रोकडोबा मित्रमंडळ, मेन रोड येथील शिवसेवा मित्रमंडळ, शिवमुद्रा मित्रमंडळाचा मानाचा राजा, मुंबई नाका युवक मित्रमंडळ, जुने नाशिक दंडे हनुमान मित्रमंडळ, युनायटेड मित्रमंडळ, शनैश्चर युवक समिती, नेहरू चौक मित्रमंडळ, नवीन आडगाव नाका सांस्कृतिक कला, क्र ीडामंडळ, श्री गणेश मूकबधीर मित्रमंडळ, गजानन मित्रमंडळ, द्वारकामाई मित्रमंडळ सहभागी आहेत. विविध मंडळांकडून पारंपरिक मर्दानी खेळ सादर करण्यात आले.पालकमंत्र्यांचे ढोलवादन४विसर्जन मिरवणुकीच्या प्रारंभीच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेले ढोलवादन आणि धरलेल्या फेराने सर्वच राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येदेखील उत्साह संचारला. काही क्षणांसाठी ढोल वाजवत महाजन यांनी त्यांच्या ढोलवादन कौशल्याचा जणू प्रत्यय दिला, तर सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी यांनी मिरवणुकीला प्रारंभ झाल्यानंतर काही क्षण नृत्यासह पिपाणीवादन करीत उपस्थितांची दाद मिळवली.पेशवाई मिरवणूक लक्षवेधीगुलालवाडी व्यायामशाळेच्या बालगोपाळांनी मिरवणुकीच्या प्रारंभापासून केलेल्या लयबद्ध पदन्यास आणि ढोलवादक युवतींच्या कसरतींना प्रेक्षकांकडून सर्वाधिक पसंती देण्यात येत होती. गुलालवाडीच्या बालकांचे लेजीम पाहण्यासाठी प्रेक्षक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करीत होते. बालकांनी दाखविलेल्या शिस्तबद्ध खेळाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. रविवार कारंजा मित्रमंडळाने शतकोत्तरी वर्षाच्या निमित्ताने पेशवाईच्या धर्तीवर गणरायाची मिरवणूक काढून नाशिककरांना आकर्षित केले. मिरवणुकीत हत्तींना बंदी असल्याने हुबेहूब फायबरचा हत्ती तयार करून त्यावर चांदीच्या गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. छत्र चामर आणि पेशवाईप्रमाणे काढलेली मिरवणूक लक्ष वेधून घेत होती.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवNashikनाशिक