केरळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत श्रेया गावंडेला कांस्यपदक सांघिक कामगिरीत श्रेया, श्रद्धा नालगावकर चमकले
By Admin | Updated: February 5, 2015 22:48 IST2015-02-05T22:47:03+5:302015-02-05T22:48:33+5:30
केरळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत श्रेया गावंडेला कांस्यपदक सांघिक कामगिरीत श्रेया, श्रद्धा नालगावकर चमकले

केरळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत श्रेया गावंडेला कांस्यपदक सांघिक कामगिरीत श्रेया, श्रद्धा नालगावकर चमकले
नाशिक (प्रतिनिधी): चेन्नई त्रिवेंद्रम येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या श्रेया गावंडे हिने शूटिंग स्पर्धेत वैयक्तिक गटात पिस्टल प्रकारात कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम फेरी गाठणाऱ्या श्रेया हिने कामगिरीतील सातत्य राखत चांगली लढत दिली. सांघिक प्रकारातही तिने महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक पटकावित दुहेरी कामगिरी केली. श्रेया हिने आंतरविद्यापीठ शूटिंग स्पर्धेत मिळविलेले सुवर्ण आणि पुणे येथे झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याने राष्ट्रीय स्पर्धेतही ती महाराष्ट्रासाठी पदक जिंकेल असा विश्वास होता. त्यानुसार तिने अपेक्षित कामगिरी करीत वैयक्तिक कांस्यपदक मिळविले. शिवाय महाराष्ट्राच्या सांघिक गटातही सुवर्णपदक मिळवित दुहेरी यश संपादन केले. महाराष्ट्राच्या महिला शूटिंग संघाने २५ मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राच्या पदतालिकेत सुवर्णपदकाची भर टाकली. महिलांच्या या चमुत आंतरराष्ट्रीय नेमबाज कोल्हापूरची राही सरनोबत, नाशिकच्या श्रेया गावंडे आणि श्रद्धा नालगावकर यांचा समावेश होता. श्रद्धा नालगावकर हिने ५७३/६०० आणि श्रेया गावंडे हिने ५७१/६०० असा लक्ष्यभेद करीत सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले.