त्र्यंबकच्या प्रभारी सभापतिपदी शांताराम मुळाणे

By Admin | Updated: January 9, 2016 22:42 IST2016-01-09T22:31:44+5:302016-01-09T22:42:06+5:30

त्र्यंबकच्या प्रभारी सभापतिपदी शांताराम मुळाणे

Shree Shantaram will be in charge of Trimbakesh in the chair | त्र्यंबकच्या प्रभारी सभापतिपदी शांताराम मुळाणे

त्र्यंबकच्या प्रभारी सभापतिपदी शांताराम मुळाणे


त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक पंचायत समितीच्या प्रभारी सभापतिपदी विद्यमान उपसभापती शांताराम
मुळाणे यांची नियुक्ती करण्यात आली. सभापती गणपत वाघ यांनी पदाचा राजीनामा दिल्याने मुळाणे यांची प्रभारी सभापतिपदी वर्णी लागली.
शांताराम मुळाणे ४ वर्षांपासून उपसभापती असून, त्यांनी गावात अनेक योजना राबविल्या
आहेत. जलयुक्त शिवार अभियान, घरकूल योजना, कृषी आरोग्य, बालविकास, शैक्षणिक आदि योजनांचा पंचायत समितीशी
निगडित लाभार्थींना लाभ मिळवून दिला.
जिल्हा परिषदेचे माजी
उपाध्यक्ष संपत सकाळे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी गणपत
वाघ, नळवाडीचे सामाजिक
कार्यकर्ते भगवान भिवसेन,
उपसरपंच रोहिदास बोडके,
ग्रामसेवक युवराज ठाकरे
आदिंसह ग्रामस्थ उपस्थित
होते. (वार्ताहर)

Web Title: Shree Shantaram will be in charge of Trimbakesh in the chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.