पंचमुखी हनुमान मंदिरात श्रीरामचरित्र पाठ
By Admin | Updated: November 14, 2015 23:01 IST2015-11-14T23:01:29+5:302015-11-14T23:01:29+5:30
पंचमुखी हनुमान मंदिरात श्रीरामचरित्र पाठ

पंचमुखी हनुमान मंदिरात श्रीरामचरित्र पाठ
पंचवटी : जुना आडगाव नाक्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात कार्तिक मासनिमित्त अखंड श्रीरामचरित्रमानस पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील दुष्काळाचे सावट दूर व्हावे, हरितक्रांती घडावी, देशात शांतता नांदावी यासाठी पंचमुखी हनुमान मंदिरातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महंत भक्तिचरणदास महाराज यांनी दिली.
कार्तिक मासात दानधर्म करण्याची प्रथा असल्याने भाविक श्रद्धेने दान करतात. दि.२५ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाची सांगता होणार असून पूर्णाहुती, भंडारा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या अखंड श्रीरामचरित्र मानस पाठासाठी अकरा ब्रह्मवृंद असून, ते दिवसरात्र रामचरित्रमानस पाठाचे पठण करीत आहेत. भाविकांनी या अखंड रामचरित्रमानस पाठाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भक्तिचरणदास यांनी केले आहे. (वार्ताहर)