श्रीक्षेत्र मढी यात्रेसाठी २०० नाथभक्त पायी रवाना
By Admin | Updated: April 6, 2016 00:16 IST2016-04-05T23:11:10+5:302016-04-06T00:16:54+5:30
श्रीक्षेत्र मढी यात्रेसाठी २०० नाथभक्त पायी रवाना

श्रीक्षेत्र मढी यात्रेसाठी २०० नाथभक्त पायी रवाना
श्रीक्षेत्र मढी यात्रेसाठी
२०० नाथभक्त पायी रवाना वावी : गुढीपाडव्यानिमित्त
श्रीक्षेत्र मढी येथे भरणाऱ्या कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून सुमारे दोनशे नाथभक्त मढीकडे पायी रवाना झाले.
श्रीक्षेत्र मढी येथे होळी
पौर्णिमा ते गुढीपाडवा या काळात यात्रोत्सव भरतो. राज्यभरातून
लाखो भाविक या यात्रोत्सवासाठी हजेरी लावत असतात. रंगपंचमी
व गुढीपाडवा या दोन दिवशी
मढी येथे भव्य यात्रा भरते.
या यात्रेसाठी वावी
येथील नाथभक्त पायी
जात असतात. रंगपंचमी यात्रेसाठी सुमारे पाचशे नाथभक्त श्रीक्षेत्र
मढी येथे गेले होते, तर
शुक्रवारी गुढीपाडव्याच्या दिवशी भरणाऱ्या यात्रोत्सवासाठी सुमारे दोनशे नाथभक्तांची पायी दिंडी
श्रीक्षेत्र मढीकडे रवाना झाली.
अनेक वर्षांपासून पायी दिंडीद्वारे श्रीक्षेत्र मढी यात्रोत्सवाला वावीचे नाथभक्त पायी जात असतात. या पायी दिंडीत सजविलेला रथासोबत
पायी भाविकांच्या साहित्यासाठी टेम्पो व पाण्याचा टॅँक्टर
दिंडीसोबत असतो.
तळेगाव, लोणी, कोल्हार, देवळाली, टाकळीमियॉँ, सोनई, शनिशिंगणापूर, घोडेगाव, मिरी, तिसगाव या मार्गे जाणाऱ्या पायी दिंडीतील भाविकांसाठी गावोगावी चहा-पाणी, अल्पोपाहार व भोजनाची व्यवस्था केली आहे. वावी येथील कानिफनाथ महाराज काठीला मढी येथे विशेष मान असून, दरवर्षी पायी जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. (वार्ताहर)