शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणी सोमवार : सोमेश्वरसह सर्वच शिवमंदीरे गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 14:37 IST

गंगापूर शिवारातील जुने प्राचीन सोमेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराचा परिसर उजळून निघाला असून भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलले आहे. येथे स्वयंभू शिवलिंग असल्याची अख्यायिका आहे.

ठळक मुद्दे कपालेश्वर महादेव मंदिर सर्वत्र प्रसिध्दत्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ

नाशिक : पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शहरातील प्राचीन सोमेश्वर, कपालेश्वर या प्रमुख मंदिरांसह सर्वच शिवमंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची रेलचेल पहावयास मिळत आहे. श्रावणमासाला आरंभ झाला असून हा महिना सण-उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो. आज पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविकांनी मनोभावे शिवमंदीरात हजेरी लावून ‘जय भोले..., हर हर महादेव’चा गजर करत शिवपिंडीवर बेलाची पाने अर्पण क रत दर्शन घेतले. गंगापूर शिवारातील जुने प्राचीन सोमेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराचा परिसर उजळून निघाला असून भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलले आहे. येथे स्वयंभू शिवलिंग असल्याची अख्यायिका आहे. गोदाकाठालगत असलेल्या या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त आहे. भाविकांचे मोठे श्रध्दास्थान असून परिसर निसर्गरम्य असून उद्यान, बोटक्लब असल्याने तरुण-तरुणींसह भाविकांचा नेहमीच येथे राबता असतो. श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी वाढल्याने जणू जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मंदिरात दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची पावले वळल्याने गाभाऱ्यापुढे रांगा लागल्या आहेत. सकाळी मंदिरात महाभिषेक करण्यात आला. येवल्याचे प्रांतधिकारी भीमराव दराडे तथा नाशिकचे महसूल उपआयुक्त दिलीप स्वामी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. याप्रसंगी विश्वस्त भीमराव पाटील, बापूसाहेब गायकर, राहूल बर्वे, बाळासाहेब लांबे आदि उपस्थित होते. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मंदिर परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

‘कपालेश्वर’मध्येही गर्दीशहरातील पंचवटी परिसरातील रामकुंडाजवळ असलेल्या कपालेश्वर महादेव मंदिर सर्वत्र प्रसिध्द आहे. नंदी नसलेले एकमेव मंदिर म्हणून कपालेश्वरचे नावलौकिक आहे. श्रावणी सोमवारनिमिव मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी महापूजा व महाभिषेक पार पडला. संध्याकाळी कपालेश्वर पालखीची सवाद्य मिरवणूक परिसरातून काढण्यात येणार आहे. श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरात सकाळपासून भाविकांची वर्दळ दिसून येत आहे. भाविक मोठ्या संख्येने भगवान भोलेच्या दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावत आहे. 

त्र्यंबकेश्वर’लाही भाविकांची रीघनाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग आहे. श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरही भाविकांच्या गर्दीने फुलला आहे. त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी येथील ऐतिहासिक पुरातन मंदीरात भाविकांची रीघ लागली आहे. सकाळी महापूजा, महाभिषेक मंदिरात करण्यात आला.राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने ‘श्रावणी त्र्यंबक यात्रा’ कॅच केली जात असून जादा बसेसचे नियोजन जुन्या सीबीएस स्थानकातून करण्यात आले आहे. सुमारे शंभर बस नाशिक-त्र्यंबक-नाशिक मार्गावर धावत आहेत. बसस्थानकावर भाविकांची त्र्यंबकेश्वर गाठण्यासाठी झुंबड उडाली आहे.

टॅग्स :TempleमंदिरNashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर