शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणी सोमवार आठ; पण उपवास करा चारच!

By धनंजय वाखारे | Updated: July 17, 2023 06:52 IST

१७ ऑगस्टपासून शुद्ध श्रावण : पंचांगकर्ते म्हणतात, काम्य व्रत टाळा

धनंजय वाखारेनाशिक : चातुर्मासास प्रारंभ झालेला असताना यंदा श्रावण महिना अधिक आला आहे. येत्या मंगळवारपासून अधिक श्रावण मासास प्रारंभ होत आहे. यंदा दोन श्रावण मास असल्याने आठ श्रावणी सोमवार आले आहेत. परंतु, १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत नीज (शुद्ध) श्रावण महिना असल्याने याच महिन्यातील चार श्रावणी सोमवारचे उपवास करावेत, असे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.  

दर तीन वर्षांत एकदा कोणता तरी महिना अधिकमास येतो.  दर १९ वर्षांनी पुन्हा तोच महिना अधिकमास येतो, असा एक साधारण नियम  आहे. यापूर्वी सन २००४ मध्ये अधिक श्रावण महिना आला होता. त्यानंतर शके १९६४ मध्ये १७ जुलै २०४२ ते १५ ऑगस्ट २०४२ या कालावधीत अधिक श्रावण मास आहे. मात्र, यानंतरचा अधिक महिना हा ज्येष्ठ असणार असून, शके १९४८ मध्ये १७ मे २०२६ ते १५ जून २०२६ दरम्यान हा अधिक ज्येष्ठ येईल. यावर्षी श्रावण अधिक असल्याने श्रावण मासात केली जाणारी सर्व वार - व्रते  नीज मासात म्हणजेच १७ ऑगस्ट  ते १५ सप्टेंबर २०२३  या कालावधीत करावीत, अधिक मासात करू नयेत.

अधिक श्रावण महिना १८ जुलै ते १६ ऑगस्टपर्यंत असून, त्यानंतर १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत नीज (शुद्ध) श्रावण महिना आहे. अमांत मास पद्धतीप्रमाणे  महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र या प्रदेशात श्रावण महिन्यातील सर्व व्रते, सोमवारचे उपवास, मंगळागौर पूजन आदी नीज श्रावण (शुद्ध) महिन्यात करावे. त्यामुळे महाराष्ट्रात श्रावणाचे आठ सोमवार नाहीत. त्यामुळे शुद्ध श्रावणात एक महिनाच श्रावणातील पूजा, व्रत करावे.      - मोहनराव दाते, पंचांगकर्ते, सोलापूर

 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलNashikनाशिक