शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती कार्यालयावर आॅनलाइन शिक्षणाच्या धोरणा विरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 17:36 IST

इगतपुरी : ९ आॅगष्ट आदिवासी क्र ांतीदिनाचे औचित्य साधुन श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती कार्यालयावर आॅनलाईन शिक्षण धोरणाचा सन्मान करून आदिवासी विद्यार्थाना आधुनिक शैक्षणिक साहीत्य मोफत द्यावे या मागणीसाठी पंचायत समिती सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देआॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी मुलांना महागडे मोबाईल घेणे शक्य नाही

लोकमत न्युज नेटवर्कइगतपुरी : ९ आॅगष्ट आदिवासी क्र ांतीदिनाचे औचित्य साधुन श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती कार्यालयावर आॅनलाईन शिक्षण धोरणाचा सन्मान करून आदिवासी विद्यार्थाना आधुनिक शैक्षणिक साहीत्य मोफत द्यावे या मागणीसाठी पंचायत समिती सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे यांना निवेदन दिले.

राज्यात कोरोना संसर्गामुळे देशाची सर्व व्यवस्था कोलमडली असतांना शिक्षण प्रणालीत बदल करून शासनाने एक नवे धोरण अवलंबले. याचा श्रमजीवी संघटनेच्या वतीने शासनाचे जाहीर स्वागत केले, मात्र राज्यात आदिवासी वाड्या-पाडयावर आधीच कुपोषण, बेरोजगारी, आरोग्य, वनजमिनी करीता वेठीस असलेला आदिवासी बांधव आपली उपजीविका कशीबशी भागवतो.एकीकडे आॅनलाइन शिक्षण घेण्यासाठी मुलांना महागडे मोबाईल घेणे शक्य नाही म्हणुन आदिवासी व आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थानां शासनाने मोफत शैक्षणिक साधने पुरवावेत असे निवेदनात म्हटले आहे. ज्या मुलांच्या आईवडीलांनी शाळेचे तोंडही पाहिले नाही अशा गरीब आदिवासी मुलांनी कसे शिकायचे हा प्रश्न आहे. तर अनेक भागात आजपर्यंत वीजच पोहोचली नाही, तेथे इंटरनेट व मोबाईल चालणार कसे आदींचा विचार करून शासनाने संघटनेच्या निवेदनातील मागण्या मान्य करावा असे संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांनी सांगितले.आदिवासी दुर्गंम भागात इंटरनेट नेटवर्क सेवा उपलब्ध करावी, प्रत्येक आदिवासी आर्थिक दुर्बंल घटकातील विद्यार्थाला लॅपटॉप, स्मार्ट फोन मोफत उपलब्ध करून द्यावा, ज्या दुर्गम भागात विज नाही त्या ठिकाणी विजेची उपलब्धता निर्माण करावी आदीसंघटनेच्या मागण्या शासनाने त्वरीत मान्य कराव्यात असे निवेदनात नमुद केले आहे.यावेळी श्रमजीवी संघटनेचे संजय शिंदे, संतोष ठोमरे, शांताराम भगत, निता गावंडा, रोहिणी चव्हाण, लता मेंगाळ, सुनिल लोहरे, काळु भस्मे, रामदास सावंत, सिताराम गावंडा, सुनिल वाघ, शांताराम पागीर, भोरू पुंजारे, अलका रण, मथुरा भगत, शिवनाथ मुकणे, कुसुम वाघ, मिनींद पंडित, तान्हाजी कुंदे आदि उपस्थित होते. 

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण