श्रमिकनगरला जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया
By Admin | Updated: June 4, 2014 00:15 IST2014-06-03T23:50:58+5:302014-06-04T00:15:58+5:30
नाशिक : श्रमिकनगर येथे जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

श्रमिकनगरला जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया
नाशिक : सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथे जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. सदरची घटना सायंकाळच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कुठलीही दखल घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांत जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. परंतु त्याचबरोबर उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. महापालिकेने दक्षता घेण्याच्या सूचना यापूर्वीच आयुक्तांनी दिल्या आहेत. परंतु, पालिकेकडून कोणतीही कारवाई सतर्कतेने केली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. (प्रतिनिधी)