श्रद्धाविहार कॉलनीत गटारीचे पाणी रस्त्यावर

By Admin | Updated: August 12, 2016 23:33 IST2016-08-12T23:32:33+5:302016-08-12T23:33:09+5:30

दुर्गंधी : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Shraddhaivahar colony drainage water on the road | श्रद्धाविहार कॉलनीत गटारीचे पाणी रस्त्यावर

श्रद्धाविहार कॉलनीत गटारीचे पाणी रस्त्यावर

इंदिरानगर : प्रभाग ५४ मधील श्रद्धाविहार कॉलनीत भूमिगत गटारीचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी दुतर्फा वाहत असल्याने विद्यार्थीवर्ग व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कॉलनीला घाण व दुर्गंधीयुक्त पाण्याने विळखा घातला असून, रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
श्रद्धाविहार कॉलनीत सुमारे ४५ बंगले, अपार्टमेंट व सोसायट्या आहेत. यामध्ये शेकडोच्या संख्येने नागरिक वास्तव्य करीत आहे. तसेच एक माध्यमिक विद्यालय, दोन कनिष्ठ विद्यालय असल्याने तेथे शिक्षण घेण्यासाठी शेकडोच्या संख्येने विद्यार्थी येतात, परंतु गेल्या तीन दिवसांपूर्वी सुमारे चोवीस तास झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील महापालिकेच्या सुमारे पाच ते सहा भूखंडांवर पावसाच्या पाण्याची डबकी तयार झाली आहेत. त्यातच परिसरातील असलेल्या भूमिगत गटारींच्या चेंबरमधून वाहणारे घाण व दुर्गंधीयुक्त पाण्याची भर पडत आहे. त्यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना पादचाऱ्यांना व वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गेल्या चार दिवसांपासून घाण व दुर्गंधीयुक्त वाहणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Shraddhaivahar colony drainage water on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.