मैत्रीवरील काव्यपंक्तींचा वर्षाव

By Admin | Updated: August 3, 2014 01:57 IST2014-08-03T01:55:32+5:302014-08-03T01:57:02+5:30

मैत्रीवरील काव्यपंक्तींचा वर्षाव

Show poetry of friendship | मैत्रीवरील काव्यपंक्तींचा वर्षाव

मैत्रीवरील काव्यपंक्तींचा वर्षाव

 

नाशिक : तुझी मैत्री नक्षत्रासारखी, नेहमी न दिसणारी पण नेहमीच असणारी, माझे जीवन फुलविणारी...
मैत्रीचं नातं हे पिंपळाच्या पानासारखं असावं, कितीही जाळी झाली तरी जीवनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवायला हवं.., अशा एकापेक्षा एक सरस मराठी तसेच हिंदी, इंग्रजी भाषेतील काव्यपंक्तींच्या ओळींचा वर्षाव तरुणाईकडून फे्रन्डशिप डे अर्थात मैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होता.
आॅगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हटला की, मैत्री दिनाच्या निमित्ताने तरुणाईच्या आनंदाला उधाण येते. मैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला कॉलेजरोड, मेनरोड, गंगापूररोड, नाशिकरोड आदि भागांतील ‘फ्रेन्डशिप बॅन्ड, रिंग’च्या खरेदीसाठी युवक-युवतींच्या झालेल्या गर्दीमुळे दुकाने गजबजलेली होती. यंदा बाजारात विविध प्रकारचे मैत्रीचे ऋणानुबंध घट्ट करणारी तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींचे मने जिंकून घेणारे आकर्षक बॅन्ड विक्रीसाठी आले आहेत.
हॅप्पी फ्रेन्डशिप डे, माय बेस्ट फ्रेन्ड, माय गुड फ्रेन्ड असा उल्लेख असलेल्या विविध प्रकारच्या आकर्षक पद्धतीच्या बॅन्डला तरुणाईकडून पसंती दिली जात होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बॅन्डचे विविध प्रकार बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले असले तरी त्यांच्या किंमतीमध्ये देखील वाढ झाली आहे.
तरीदेखील तरुणाईचा उत्साह कमी झालेला नसल्याचे दिसून आले. तरुणाईने बॅन्ड खरेदी करण्याबरोबरच विविध प्रकारची शुभेच्छापत्रेदेखील खरेदी करण्यावर भर दिला. एकूणच तरुणाई मैत्री दिन साजरा करण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र पूर्वसंध्येलाच शहर व परिसरात पहावयास मिळाले. (प्रतिनिधी)

Web Title: Show poetry of friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.