शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या ऐक्याची जबाबदारी सुनील बागुल यांच्या खांद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 23:18 IST

जिल्ह्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील बागुल यांनी करावे, असा ठराव मराठा समाज संघटनांनी मंजूर केला आहे.

नाशिक: जिल्ह्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील बागुल यांनी करावे, असा ठराव मराठा समाज संघटनांनी मंजूर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाला विकृत वळण देण्याचा प्रयत्न काही राजकीय नेत्यांचे स्थानिक हस्तक करीत असल्याच्या शंकेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे या संघटनांनी प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त पत्रकात म्हटले आहे.गेल्या दोन वर्षांपासून मराठा क्रांती मूक मोर्चा शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे.९ ऑगस्ट क्रांती मोर्चाची वर्षपूर्ती साजरी होत असताना मूक मोर्चाने ठोक मोर्चाची भूमिका जाहीर केल्यानंतर शांत असलेला मराठा समाज आपल्या भावना आक्रमकपणे व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर येऊ लागला. याचा राजकीय फायदा उठविण्याच्या कूट हेतूने काल परवापर्यंत मराठा समाजाने जाणीवपूर्वक दूर ठेवलेल्या काही राजकीय नेत्यांनी आपले हस्तक घुसवून आंदोलनाला विकृत वळण देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडवून आणत मराठा क्रांती मोर्चाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला.महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू असलेल्या या प्रयत्नांना नाशिकमधील क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी शह देत शांततेला गालबोट लावू न देता आपले आंदोलन सुरू ठेवले. नाशिक शांत आहे म्हणून अस्वस्थ असलेल्या या राजकीय नेत्यांनी आपल्या हस्तकांकरवी प्रति क्रांती मोर्चा उभा करून आजपर्यंतच्या या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. हे कटकारस्थान उधळून जिल्ह्यातील समाज एकसंघ राहावा कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या हेतूने गेली दहा ते पंधरा वर्ष आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध संघर्ष करणा-या मराठा संघटनांनी या चळवळीचे नेतृत्व शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील बागुल यांना सोपविण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकmarathaमराठा