शॉटसर्किटने बसला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:53 IST2017-07-18T00:53:16+5:302017-07-18T00:53:28+5:30
शॉटसर्किटने बसला आग

शॉटसर्किटने बसला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : आगाराची पिंपळगाव बसवंत - निफाड बसच्या मागील भागात शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. मात्र बसच्या मागून येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येतान त्यांनी वेळीच बस थांबवून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
दुपारी १ वाजेची पिंपळगाव बसवंत - निफाड बस (एमएच १२ सीएच ७५८०) प्रवासी व विद्यार्थी घेऊन निफाडकडे जात असताना लोणवाडीजवळ बसच्या टपाच्या मागील बाजूस अचानक धूर येऊ लागला. दरम्यान पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याची गाडी त्याचवेळी पालखेड येथून पिंपळगावकडे येत होते.
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी लगेच बसचा पाठलाग करून बस थांबवत बसमधील प्रवाशांना तत्काळ खाली उतविले. पोलीस शिपाई अमोल जाधव व नंदू जाधव यांच्या मदतीने बसच्या बॅटरीच्या
वायर काढल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
बसच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने बसच्या मागील सिटाजवळील आतील भाग थोडासा जळाला. दरम्यान काही वेळेनंतर बस प्रवासी घेऊन निफाडकडे रवाना झाली.नेहमीप्रमाणे प्रवासी व शाळेतील विद्यार्थी घेऊन निफाडला जात असताना लोणवाडी जवळ बसच्या टपाच्या मागील बाजूस अचानक धूर येत होता. दरम्यान पिंपळगाव पोलीस ठाण्याचे वाहन पालखेड येथून येत असताना पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आला.