प्राथमिक आरोग्य केंद्रात शॉटसर्किट
By Admin | Updated: July 24, 2016 23:01 IST2016-07-24T22:59:50+5:302016-07-24T23:01:59+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रात शॉटसर्किट

प्राथमिक आरोग्य केंद्रात शॉटसर्किट
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथे शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सिंगल फेजचे थ्री फेज विजेत रूपांतर झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वीजपुरवठा करणारी केबल शॉर्टसर्किटमुळे जळाली.
परिणामी प्राथमिक आरोग्य केंद्राचा वीजुपरवठा खंडित झाला. यावेळी आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्यात आले. मात्र अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असल्याने
केबलला लागलेली आग त्वरित विझविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
या घटनेत आरोग्य केंद्रात उपस्थित रुग्णांना इजा झाली नाही.तसेच कोणतेही नुकसान झाले नाही. (वार्ताहर)