शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कांदा बियाण्याचा तुटवडा; दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 18:19 IST

नाशिक : गतवर्षी गगनाला भिडलेल्या कांदा दराने यावर्षी मात्र शेतकऱ्यांना रडविले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात दोन महिन्यांपासून लॉकडाउन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील बाजार समित्या कधी सुरू, तर कधी बंद राहिल्याने कांदा भावावर त्याचा परिणाम झाला. सध्या कांद्याला मिळणाºया भावातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतक-यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. केंद्र शासनाने कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, आगामी काळात कांद्याला भाव येण्याच्या अपेक्षेने यावर्षी कांदा लागवड वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र यावर्षी कांदा बियाण्याचा तुटवडा जाणवत असून, बियाण्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

ठळक मुद्देमागील वर्षी कांद्याला उच्चांकी दरभावाच्या अपेक्षेने लागवडीचे नियोजन

नाशिक: गतवर्षी गगनाला भिडलेल्या कांदा दराने यावर्षी मात्र शेतकऱ्यांना रडविले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात दोन महिन्यांपासून लॉकडाउन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील बाजार समित्या कधी सुरू, तर कधी बंद राहिल्याने कांदा भावावर त्याचा परिणाम झाला. सध्या कांद्याला मिळणाºया भावातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतक-यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. केंद्र शासनाने कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, आगामी काळात कांद्याला भाव येण्याच्या अपेक्षेने यावर्षी कांदा लागवड वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र यावर्षी कांदा बियाण्याचा तुटवडा जाणवत असून, बियाण्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.मागीलवर्षी कांद्याला उच्चांकी दर मिळाला होता. अगदी १५ हजार रुपये क्विंटलपर्यंत दर गेल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या चेह-यावर हसू फुलले होते. गतवेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे लागवड झालेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक शेतकºयांनी दुबार लागवड करूनही उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. यामुळे शेतक-यांना घरचे बियाणे तयार करता आले नाही. यावर्षी कोरोनाचे संकट आल्याने लॉकडाउनमुळे अनेक देशांमध्ये होणारी निर्यात बंद झाल्याने कांद्याचे दर कोसळले आहेत. सध्या उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त ९४१, तर सरासरी ७०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. यामुळे शेतक-यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतक-यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा