गोदाकाठ परिसरात शेतमजुरांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 06:24 PM2021-04-19T18:24:45+5:302021-04-19T18:25:13+5:30

चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे शेतीक्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक शेतमजूर आपल्या गावी परतू लागल्यामुळे शेतीच्या कामासाठी मजुरांचा तुटवडा जाणवू लागल्याचे चित्र गोदाकाठ परिसरात पाहायला मिळत आहे.

Shortage of agricultural labor in Godakath area | गोदाकाठ परिसरात शेतमजुरांचा तुटवडा

गोदाकाठ परिसरात शेतमजुरांचा तुटवडा

Next
ठळक मुद्देनिर्बंधांचा फटका : अनेक मजूर गावाकडे परतले

चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे शेतीक्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक शेतमजूर आपल्या गावी परतू लागल्यामुळे शेतीच्या कामासाठी मजुरांचा तुटवडा जाणवू लागल्याचे चित्र गोदाकाठ परिसरात पाहायला मिळत आहे.

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बारमाही बागायत पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होत आहे. त्यामुळे अनेक निर्बंध लागू केले आहे. गेल्यावेळीही लॉकडाऊन लावला होता. त्यावेळीही शेतमजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते.
शेतमालकाकडून सर्वच सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या; परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी अनेक अडचणींना मजुरांना समोरे जावे लागले होते. सध्याच्या निर्बंधांची धास्ती या शेतमजुरांनी घेतली असल्यामुळे अनेक मजूर गावाकडे परतू लागले आहेत.

सध्या खरीप हंगामपूर्व मशागत, उसाच्या खोडवा पिकाचे संवर्धन, कांदा काढणी, भुईमूग पेरणी व खुरपणी, डाळिंब, द्राक्षे पिकांची छाटणी, भाजीपाला पिकांची तोडणी, कांदे काढणे व साठवण करणे, द्राक्ष बागांची छाटणी करणे अशी शेतीची कामे चालू आहेत. या सर्व कामांसाठी मजूर वर्गाची मोठ्या प्रमाणात गरज भासते. या कामांसाठी परजिल्ह्यातील तर काही पेठ, सुरगाणा, नांदगाव, धुळे, अकोला, बागलाण, इगतपुरी या भागातील मजूर येत असतात. मात्र वाढत्या कोरोनामुळे अनेक मजुरांनी घराची वाट धरली आहे.

स्थानिक मजूर घरीच...
विदर्भ, मराठवाडा व नाशिकच्या इतर तालुक्यातील व परप्रांतीय मजूर या भागात स्थिरावले होते. मात्र सध्या लागू केलेल्या निर्बंधामुळे या भागातील बरेच मजूर आपापल्या गावी निघून गेलेले आहेत. तर स्थानिक मजूर संसर्गाच्या भीतीने घरीच बसून आहे. त्यामुळे शेतमालकांसमोर मजुरांच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या सावड पद्धतीने शेतीची कामे पूर्ण शेतकरी करत आहे. मात्र हे प्रमाण नगण्य आहे. स्थानिक मजुरांना विनंती करून कामाला बोलवावे लागत आहे. मात्र त्यासाठी अधिक पैसे मागत असल्याचे चित्र आहे.

गोदाकाठ परिसरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असल्याने कोणीही कामासाठी शेतावर यायला तयार नाही. त्यामुळे स्वतःच व कुटुंबातील सदस्यांना सर्व शेती कामे करावी लागत आहेत.
- सोमनाथ शिंदे, द्राक्ष उत्पादक, चांदोरी.

Web Title: Shortage of agricultural labor in Godakath area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.