चांदवडला मूर्ती संकलनास अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:09+5:302021-09-21T04:16:09+5:30

मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती देणाऱ्यांना प्रशासक प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख व मुख्य अधिकारी अभिजित कदम यांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार ...

Short response to Chandwad idol collection | चांदवडला मूर्ती संकलनास अल्प प्रतिसाद

चांदवडला मूर्ती संकलनास अल्प प्रतिसाद

मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती देणाऱ्यांना प्रशासक प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख व मुख्य अधिकारी अभिजित कदम यांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार होते. मात्र, भाविकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. दिवसभरात अवघ्या ८० मूर्ती संकलित झाल्याची माहिती अभियंता सत्यवान गायकवाड यांनी दिली. दरम्यान, चांदवडच्या पुरातन रंगारी तलावात श्री गणपती विसर्जन भाविकांनी मनोभावे केले तर विसर्जनासाठी पोलीस कार्यालयाच्या मार्फत पट्टीच्या पोहणाऱ्या पोलीस मित्रांनी गणेश विसर्जन उत्साहात पार पाडले. गणरायाला वाजतगाजत न्यायला शासनाने काही निर्बंध घालून दिल्याने काही भाविकांनी लहान ढोल-ताशा व लाऊडस्पीकरचा वापर केला. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, उपनिरीक्षक गजानन राठोड, पोपट कारवाल, विशाल सणस व चाळीस पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

-

फोटो -२० चांदवड गणेश मूर्ती

200921\20nsk_31_20092021_13.jpg

फोटो -२० चांदवड गणेश मूर्ती 

Web Title: Short response to Chandwad idol collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.