शॉर्टसर्किटमुळे ‘मीटर बॉक्स’ला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:14 IST2021-04-15T04:14:52+5:302021-04-15T04:14:52+5:30

बुधवार (दि.१४) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पिंगळे चौकातील शिवम पार्क सोसायटीच्या आवारात असलेल्या मीटर बॉक्सला शॉर्टसर्किटमुळे आग ...

Short circuit caused the meter box to catch fire | शॉर्टसर्किटमुळे ‘मीटर बॉक्स’ला आग

शॉर्टसर्किटमुळे ‘मीटर बॉक्स’ला आग

बुधवार (दि.१४) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पिंगळे चौकातील शिवम पार्क सोसायटीच्या आवारात असलेल्या मीटर बॉक्सला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग लागल्याची घटना कळल्यानंतर प्रभाग क्रमांक तीसचे नगरसेवक श्‍याम बडोदे, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत सोनवणे यांच्यासह इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख तसेच येथील रहिवाशांनी सिडको अग्निशामक दलाला फोनवरून माहिती दिल्याने अग्निशमन दलाचे जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली. या आगीत संपूर्ण बिल्डिंगचे मीटर व वायरिंग जळून खाक झाले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान मल्हारी आहिरे,चंद्रमोरे ,जगदीश देशमुख ,राजेंद्र घाडगे, प्रमोद लहामगे यांच्यासह सोसायटीतील नागरिक यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: Short circuit caused the meter box to catch fire