मनमाड येथे दुकानाला आगं

By Admin | Updated: March 31, 2016 23:00 IST2016-03-31T22:58:44+5:302016-03-31T23:00:31+5:30

मनमाड येथे दुकानाला आगं

Shops at the Manmad | मनमाड येथे दुकानाला आगं

मनमाड येथे दुकानाला आगं

मनमाड : येथे चांदवड रोडवर आज सकाळी एका दुकानाला अचानक आग लागल्याने दुकानातील सामान जळून खाक झाले आहे.
येथील निमोण चौफुलीवर असलेल्या जावेद शेख यांच्या आदील आॅटो इलेक्ट्रिकल व बॅटरी सर्व्हिसेस या दुकानातून सकाळी धुराचे लोट येऊ लागले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. बाजूच्या टपऱ्यांना आग लागणची शक्यता असल्याने नागरिकांमधे घबराट उडाली.
परिसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. जवळून उच्च दाबाची वीजवाहिनी जात असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. पालिकेच्या अग्निशमन बंबाने काही वेळातच पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. बाजूच्या दुकानांना आगीची झळ पोहचू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली.
या आगीमध्ये दुकानातील बॅटऱ्या तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले. तलाठी रमेश निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अकस्मात आग लागून ७६ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Shops at the Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.