पिंपळगावी दुकाने बंद, नागरीक मात्र रस्त्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 01:01 IST2021-04-07T22:00:02+5:302021-04-08T01:01:28+5:30
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पाच दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद असूनही नागरीक मात्र रस्त्यांवर गर्दी करताना दिसून येत आहे.

पिंपळगावी दुकाने बंद, नागरीक मात्र रस्त्यांवर
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पाच दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद असूनही नागरीक मात्र रस्त्यांवर गर्दी करताना दिसून येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपळगाव बसवंत प्रशासनाने व्यावसायिकांशी चर्चा करून पाच दिवसांचा जनता कर्फ्यू शहरात लागू केला आहे. त्याला व्यवसायिकांनी देखील चांगला प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवत जनता कर्फ्यू पाळला आहे मात्र शहरातील नागरिक रस्त्यावर गर्दी करत असल्याने जनता कर्फ्यूच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. सदर नागरिकांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.