पंचवटीत अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:14 IST2021-04-22T04:14:57+5:302021-04-22T04:14:57+5:30
कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर शासनाने गेल्या आठवड्यात संचारबंदी लागू करून निर्बंध लादले होते मात्र या संचारबंदीत नागरिकांचा विविध कारणे देत ...

पंचवटीत अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद
कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर शासनाने गेल्या आठवड्यात संचारबंदी लागू करून निर्बंध लादले होते मात्र या संचारबंदीत नागरिकांचा विविध कारणे देत विनाकारण रस्त्यावर मुक्तपणे संचार असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. एकीकडे प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत असले तरी, दुसरीकडे मात्र बेशिस्त नागरिक विनाकारण घराबाहेर विना मास्क फिरून कोरोना नियमांचे उघडपणे उल्लंघन करत असल्याचे आढळून आल्याने शासनाने बुधवारपासून कठोर निर्बंध लादले आहेत. त्यानुसार आज पहिल्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजल्यानंतर दुकानदारांनी दुकाने बंद केली. संचारबंदी जारी करण्यात आली असली बेशिस्त नागरिक रस्त्यावर तर टवाळखोर युवक बिनधास्त दुचाकीवर ट्रिपल सीट फिरून नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले.
इन्फो====
अर्धवट शटर ठेवून ग्राहक सेवा
पंचवटीतील काही दुकानदार नावापुरते दुकानाचे शटर खाली करून ग्राहक आल्यानंतर दुकानाचे शटर उघडून ग्राहकांना वस्तू देत आहेत. दुकानदार दुकान बंद करून दुकानाबाहेर बसून राहात असून, ग्राहकांना पाहिजे त्या वस्तू सहज दुकानातून काढून देत असल्याचे दिसून येते.