शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा विक्रीप्रकरणी तीनदा कारवाई झालेल्या दुकानदारावर आता थेट मोक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 16:20 IST

धर्मराव आत्राम, शाळेच्या ५०० मीटर आवारात कारवाईसाठी समिती.

नाशिक : गुटखा बंदीसाठी शासनाची भूमिका कडक आहे. आतापर्यंत आम्ही ७० कोटी रुपयांचा अवैध गुटखा पकडला आहे. शाळापरिसरात ५०० मीटरवर असणाऱ्या गुटखा विक्रेत्यांवर कारवाईसाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. अवेध गुटखा विक्रीप्रकरणी तीनदा कारवाई झाल्यास संबंधित विक्रेत्यावर थेट मोक्का अंतर्गत कारवाईची घोषणा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केली. 

नाशिक येथे आयोजीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विभागातील पाच जिल्हे आणि आता पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा या बैठकीत घेतला. पीपीपी तत्वावर लॅब तयार करून भेसळ तपासण्यासठी यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. सध्या ३ लॅब्स कार्यरत असल्याने नमुने तपासणीसह कारवाईस उशिर होत असल्याची बाब मान्य करीत त्यावर उपाययोजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली आहे, या विभागात ५०० जणांची भरती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. १० फिरत्या प्रयोगशाळा प्रगतीपथावर असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. हॉटेल मधील खराब अन्नाच्या पाश्व'भूमीवर बोलताना स्वच्छ जेवण देण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. 

मालेगावमधील कुत्ता गोली प्रकरणी सर्व जणांवर कारवाई निश्चित असल्याचे ते म्हणाले. दिवाळीत आढळलेल्या बनावट पनीर आणि मिठाईसंदर्भात लोकांनी तारीखसह इतर बाबी बघितल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. यासंदर्भात काही माहिती असेल तर टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा, कारवाई नक्की होईल असे आवाहनही त्यांंनी केले. जितेंद्र आव्हाड यांना आपण ओळखत नाही असे म्हणून त्यांनी त्यावर भाष्य टाळले. 

ऑनलाईन औषधविक्रीवर नजर:

डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसतानाही ऑनलाईन पद्धतीने औषधांची केली जाणारी विक्री धोकादायक असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर आता त्यावरही अंकूश आणणार असल्याचे सांगत प्रिस्क्रिप्शन नसताना औषधे दिल्यास अशा दुकानदारांवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Nashikनाशिक