दुकानदार आक्रमक : त्रुटी दूर करण्याचे आवाहन रेशन दुकानदारांच्या मृत्यूने ‘पॉस’ यंत्र चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:17 IST2018-03-23T00:17:37+5:302018-03-23T00:17:37+5:30
नाशिक : स्वस्त धान्य दुकानदारांना दिलेल्या पॉस मशीनमधील त्रुटीमुळे वादातून वर्धा जिल्ह्यातील दोन रेशन दुकानदारांचा मानसिक ताणामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे रेशन दुकानदारांनी पुन्हा एकवार पॉस मशीनच्या तांत्रिक दोषाबद्दल राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

दुकानदार आक्रमक : त्रुटी दूर करण्याचे आवाहन रेशन दुकानदारांच्या मृत्यूने ‘पॉस’ यंत्र चर्चेत
नाशिक : शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना दिलेल्या पॉस मशीनमधील त्रुटीमुळे दुकानदारांचे शिधापत्रिकाधारकांशी होणाऱ्या वादातून वर्धा जिल्ह्यातील दोन रेशन दुकानदारांचा मानसिक ताणामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे रेशन दुकानदारांनी पुन्हा एकवार पॉस मशीनच्या तांत्रिक दोषाबद्दल राज्य सरकारला धारेवर धरले आहे. शासनाने लवकरात लवकर पॉस मशीनचे दोष दूर करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात रेशन दुकानदार संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिधापत्रिकाधारकांचे अंगठे न जुळल्यामुळे त्यांना रेशन देणे दुकानदारांना अवघड झाले आहे. धान्य न दिल्यामुळे शिधापत्रिकाधारक दुकानदाराशी वाद घालत आहेत. वेळप्रसंगी अरेरावी होऊन त्यातून मारहाणीच्या घटनाही घडत आहेत. या प्रकारामुळे रेशन दुकानदार त्रस्त झाले आहेत. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे म्हणाले की, ही घटना अतिशय दुर्दैवी असून, अशा प्रकारच्या आणखी घटना घडण्यापूर्वीच शासनाने मशीनमधील त्रुटी दूर कराव्यात. यावेळी विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील, पुंडलिक साबळे, बाबूशेठ कासलीवाल, मारुती बनसोडे, दिलीप नवले, माधव गायधनी, अशोक बोराडे, निसार शेख, भगवान आढाव, जितेंद्र पाटील, अनिल नळे, रामदास चव्हाण, विठाबाई वाघेरे, एकनाथ पवार आदी उपस्थित होते.