दुकानांची जाळपोळ : शहरात पोलिसांचे परिस्थितीवर नियंत्रण

By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-02T00:19:44+5:302015-01-02T00:20:03+5:30

विटंबना केल्या प्रकरणी सटाण्यात तणाव

Shop fire: Police situation control in the city | दुकानांची जाळपोळ : शहरात पोलिसांचे परिस्थितीवर नियंत्रण

दुकानांची जाळपोळ : शहरात पोलिसांचे परिस्थितीवर नियंत्रण

सटाणा : ग्रामदेवतेबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून विटंबना केल्याप्रकरणी शहरात तीव्र पडसाद उमटले.
अज्ञात समाजकंटकानी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भंगार दुकानासह गोदामाची जाळपोळ करून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान केले. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
सटाणा शहरातील एका माथेफिरूने ग्रामदेवतेबद्दल बुधवारी सायंकाळी आक्षेपार्ह मजकूर केल्याने संतप्त दीडशे तरुणांनी पोलिस ठाण्यावर हल्लाबोल करून कारवाईची मागणी केले होती . या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असताना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकानी बसस्थानका समोरच्या पान ठेल्याची तोडफोड केली . त्यानंतर या टोळक्याने अंधाराचा फायदा घेऊन आपला मोर्चा नगरपालिका परिसराकडे वळवला यावेळी टोळक्याने दुकानाची तोडफोड करून दहशत माजवली त्यानंतर भंगार गोदाम पेटवून दिले. या जाळपोळीत दहा लाख रु पयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे .
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात समाजकंटकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात यश आले नाही. झालेल्या दुकानांच्या जाळपोळमुळे शहरात तणावाचे वातावरण असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून महत्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. त्याचप्रमाणे देवमामलेदार यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

Web Title: Shop fire: Police situation control in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.