दुकान फोडून अडीच लाख लंपास
By Admin | Updated: April 13, 2017 22:06 IST2017-04-13T19:04:46+5:302017-04-13T22:06:33+5:30
दुकान फोडून अडीच लाख लंपास

दुकान फोडून अडीच लाख लंपास
नाशिक : येथील नेहरू गार्डनजवळील रेडिमेड कपड्यांच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ५६ हजारांची रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्यू पॅशन पॅलेस नावाचे प्रशांत सुरेश बडगुजर यांच्या मालकीचे रेडिमेड कपडे विक्रीचे दुकान आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी चोरट्यांनी दुकानाचे शटर फोडून आतमध्ये प्रवेश करत गल्ल्याचे कुलूप तोडून त्यामधील दोन लाख ५६ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बडगुजर सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यास आले असता शटर फोडल्याचे आढळून आले. यावेळी त्यांनी तत्काळ भद्रकाली पोलीस ठाण्याला सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दुकानाचा पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.