नेमबाजीत प्रियाला सुवर्ण
By Admin | Updated: September 28, 2014 00:42 IST2014-09-28T00:41:50+5:302014-09-28T00:42:08+5:30
नेमबाजीत प्रियाला सुवर्ण

नेमबाजीत प्रियाला सुवर्ण
नाशिक : दुसऱ्या पश्चिम विभाग नेमबाजी स्पर्धेत नाशिकच्या प्रिया भावसार हिने सुवर्णपदक पटकावले आहे़ मुंबईतील वरळी येथे या स्पर्धा पार पडल्या़ यामध्ये पश्चिम विभागातील महाराष्ट्रासह गोवा, दिव, दमण, गुजरात या राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता़ राज्याचे नेतृत्व करताना प्रिया भावसार हिने एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णवेध घेतला़ तिला विभागीय क्रीडा संकुल येथील प्रशिक्षक विश्वजित शिंदे, नानासाहेब देशमुख व प्रशांत मुठे यांचे मार्गदर्शन लाभले़