मामाला घाबरविण्यासाठी भाच्याकडून हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:22 IST2021-02-23T04:22:42+5:302021-02-23T04:22:42+5:30

वडनेर दुमाला येथील गोविंदनगर येथील भास्कर वामन पोरजे व कमळाबाई प्रकाश निसाळ हे भाऊ-बहीण राहतात. त्यांची विहितगाव येथे ...

Shooting in the air from the niece to scare Mama | मामाला घाबरविण्यासाठी भाच्याकडून हवेत गोळीबार

मामाला घाबरविण्यासाठी भाच्याकडून हवेत गोळीबार

वडनेर दुमाला येथील गोविंदनगर येथील भास्कर वामन पोरजे व कमळाबाई प्रकाश निसाळ हे भाऊ-बहीण राहतात. त्यांची विहितगाव येथे वडिलापार्जित जमीन आहे. भास्कर पोरजे यांनी जमिनीच्या सातबाऱ्यावरून कमळाबाईंचे नाव कमी केले होते. पोरजे हे जमिनीचा हिस्सा देत नसल्याने कमळाबाई निसाळ यांनी न्यायालयात त्यांच्याविरुध्द दावाही दाखल केला होता. दरम्यान, आपल्या आईला जमिनीचा हिस्सा मिळावा म्हणून भाचा संशयित संतोष प्रकाश मिसाळ हा शनिवारी (दि.२०) रात्री वडनेर दुमाला येथे मामा भास्कर पोरजे यांच्याकडे गेला. संतोष सेवानिवृत्त सैनिक असून त्याच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. त्याने आईला जमिनीचा हिस्सा का दिला नाही असे विचारत कुरापत काढून वाद घातला. नंतर स्वत:जवळील पिस्तूलमधून हवेत गोळीबार केला.

याप्रकरणी भास्कर पोरजे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित संतोष ( रा. शिगवेबहुला) याला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांनी संशयित संतोष यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली.

Web Title: Shooting in the air from the niece to scare Mama