शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : वाहतूक पोलिसाच्या डोक्यात चक्क फोडले नारळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 18:57 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरूध्द कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी सुकदेव सदाशिव अहिरे कर्तव्यावर होते.

ठळक मुद्देपोलिसांनी वाहनचालकाला बेड्या ठोकल्या लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला

नाशिक : शहरात वाहनचालकांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून या उपद्रवाचा फटका सर्वसामान्यांसह आता पोलिसांनाही सहन करावा लागत आहे. नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत अगदी पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर कर्तव्य बजावत असलेल्या एका शहर वाहतूक पोलिसाच्या डोक्यात वाहनचालकाने चक्क नारळ फोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे शहरात वाहतूक पोलिसांसोबत वाहनचालकांकडून होणारे गैरवर्तन दिवसेंदिवस वाढत असल्याने संताप व्यक्त होत आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरूध्द कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी सुकदेव सदाशिव अहिरे कर्तव्यावर होते. यावेळी संशयित वाहनचालक रविंद्र दामोदर मोरे (४९ रा.गजानन पार्क सिन्नरफाटा) याचे वाहन अहिरे यांनी बुधवारी (दि.३१) रात्री आठ वाजेच्या सुमारास सिन्नर फाटा पोलीस चौकीच्या समोर नाकाबंदी दरम्यान रोखले. त्याचा राग मनात धरून मोरे याने स्वत:जवळील नारळ काढून थेट अहिरे यांच्या डोक्यात फोडून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या वाहनचालकाला बेड्या ठोकल्या आहेत. मोरे हा जवळच्या एका मंदिरात दर्शनासाठी चालला होता; मात्र बेशिस्त वाहतूक करत असल्याचे लक्षात येताच त्यास पोलिसाने रोखले. त्यावेळी त्याने ‘ तु माझी गाडी का अडविली, तुला काय अधिकार आहे’ अशी भाषा वापरून वाद घालत शासकिय कामात अडथळा निर्माण केला.काही दिवसांपुर्वीच अशाचप्रकारे शालिमार येथील वाहतूक पोलिसाला रिक्षामधून उतरलेल्या काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. पोलिसांसोबत असे गैरवर्तन घडू नये यासाठी, तांना बॉडी वॉर्न कॅमेरेदेखील पुरविण्यात आले आहे; मात्र तरीदेखील त्याचीही कुठलीही तमा बेशिस्त वाहनचालक बाळगत नसून दंडात्मक कारवाई करणाºया वाहतूक पोलिसांसोबत अरेरावी करत उध्दटपणे वागण्याचे प्रकार दिवसेंदिवस शहरात वाढत असल्याचे नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtraffic policeवाहतूक पोलीसCrime Newsगुन्हेगारी