शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
4
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
5
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
6
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
7
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
8
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
9
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
10
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
11
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
12
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
13
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
14
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
15
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
16
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
17
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
18
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
19
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
20
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

धक्कादायक : कर्करोगाचे चुकीचे निदान भोवले; महिलेच्या पोटातील बाळ ‘केमो’मुळे दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 19:56 IST

संबंधित खासगी रेलीगर नावाच्या कंपनीला ग्राहक न्यायालयाने ७ लाखांचा दंड ठोठावत दणका दिला.

ठळक मुद्देपोटात वाढणारे दोन महिन्याचे बाळ दगावल्याची धक्कादायक घटना रेलिगर नावाच्या कंपनीविरूध्द २० लाख रूपयांच्या नुकसानभरपाईचा दावा

नाशिक : लॅबोरेटरीच्या चूकीच्या निदानामुळे एखाद्या रूग्णाला किती भयानक उपचार आणि त्याची ‘किंमत’ मोजावी लागू शकते, याचा प्रत्यय आणून देणारी दुर्दैवी घटना शहरात उघडकीस आली आहे. पोटात दुखत असल्यामुळे लॅबोरेटरीमध्ये जाऊन डॉक्टरच्या सल्ल्याने निदान करून घेतले असता त्या महिलेचे चूकीचे निदान करत संबंधित लॅबोरेटीमधील ‘तज्ज्ञ’ मंडळीने कर्करोगाचा रिपोर्ट सोपविला. त्या रिपोर्टच्या अधारे महिलेवर एका रूग्णालयात दोनवेळा ‘केमो’थेरपीला सामोरे जावे लागले. त्यामुळे महिलेच्या पोटात वाढणारे दोन महिन्याचे बाळ दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित खासगी रेलीगर नावाच्या कंपनीला ग्राहकन्यायालयाने ७ लाखांचा दंड ठोठावत दणका दिला.नाशिकरोडच्या रहिवाशी असलेल्या एका महिलेच्या पोटात दुखू लागल्याने त्या निदानासाठी २००९ साली सप्टेंबर महिन्यात शहरातील एका रूग्णालयात तपासणीसाठी त्या गेल्या. त्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार महिलेने 'सुपर रेलिगर लॅबोरेटरिज'मध्ये बायस्पी चाचणी केली. लॅबने कर्करोगाचे निदान करत तसा तपासणी अहवाल महिलेला सोपविल्याने महिलेला धक्का बसला; मात्र मोठ्या धैर्याने त्यांनी उपचारासाठी तयारी दर्शवून उपचार सुरू केले. शंकेला वाव नको म्हणून त्या महिलेने पुन्हा मुंबईच्या एका नामांकित खासगी रूग्णालयात तपासणी करून घेतली. तेथील डॉक्टरांनीही त्यांना कुठल्याहीप्रकारचा कर्करोग नसल्याचे निदान केले. त्यामुळे महिला व त्यांचे कुटुंबीय प्रचंड गोंधळात सापडले. त्यानंतर या पिडित महिलेने थेट ग्राहकन्यायालयाचा दरवाजा ठोठावत संबंधित संबंधित लॅबोरेटरी चालविणाऱ्या अंधेरीच्या रेलिगर नावाच्या कंपनीविरूध्द २० लाख रूपयांच्या नुकसानभरपाईचा दावा केला. अ‍ॅड. सारिका शाह यांनी त्या महिलेची बाजू न्यायालयापुढे मांडली.

टॅग्स :consumerग्राहकNashikनाशिकCourtन्यायालयHealthआरोग्यcancerकर्करोगhospitalहॉस्पिटल