शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 13:23 IST

इगतपुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नाशिक- इगतपुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, तिघेही जखमी आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत प्रशांत बोरसे हा 60 टक्के भाजला असून, तो गंभीर आहे. इगतपुरीमधील कोपरी मोहल्ला परिसरात दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. त्यातूनच तीन जणांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पूर्ववैमनस्यातून तिघा जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रशांत बंडू बोरसे, दीपक बंडू बोरसे,सुरेश गुप्ता जखमींची नावे. कुणाल किशोर हरकरे याच्यावर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील कोकणी मोहल्ला येथे गणपती विसर्जनाच्या दिवशी सायंकाळी गणपती विसर्जन करून आल्यानंतर आरोपी कुणाल किशोर हरकरे ( वय २८ ) यानं जखमी प्रशांत ऊर्फ लखन बंडू बोरसे, दीपक बंडू बोरसे यांना तू माझ्याकडे रागाने का बघतो म्हणून शिवीगाळ केली होती. तसेच त्यांच्यात बाचाबाचीही झाली. मात्र यावेळी हा वाद मिटवण्यात आला. दरम्यान रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास आरोपी कुणाल किशोर हरकरे याने घरातून रॉकेलचे भरलेले कॅन आणून रॉकेलचा बोळा पेटवून प्रशांत बोरसे व त्याचाच भाऊ दीपक बोरसे यांच्या अंगावर फेकल्याने दोघे ही गंभीर भाजले.या दोघांना वाचवण्यासाठी सुरेश ऊर्फ बबली गुप्ता हे त्यांना वाचवण्यासाठी गेले असता तेही गंभीर भाजले. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात दीपक बंडू बोरसे यांनी फिर्याद दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच मिलिंद नगर येथे चाकूहल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडला. पोलिसांचे शहरात दुर्लक्ष होत असल्याने शहरात पोलिसांचा धाक नसल्याची चर्चा सुरू असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfireआग