गुरुगोबिंदसिंग जयंतीनिमित्त शोभायात्रा

By Admin | Updated: December 22, 2014 01:21 IST2014-12-22T01:00:32+5:302014-12-22T01:21:39+5:30

गुरुगोबिंदसिंग जयंतीनिमित्त शोभायात्रा

Shobhayatra on the occasion of Guru Gobind Singh Jayanti | गुरुगोबिंदसिंग जयंतीनिमित्त शोभायात्रा

गुरुगोबिंदसिंग जयंतीनिमित्त शोभायात्रा

पंचवटी : शिख धर्मीयांचे दहावे गुरू गुरुगोबिंदसिंग यांची जयंती प्रकाश उत्सव म्हणून साजरी करण्यात येत आहे. या प्रकाश उत्सवानिमित्ताने रविवारी सायंकाळी पंचवटी गुरुसिंह सभा गुरुद्वारा येथून शोभायात्रा काढण्यात आली.
येत्या रविवारी गुरुगोबिंदसिंह यांची जयंती असल्याने पंचवटी गुरुद्वार येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पंचवटी गुरुद्वारा येथून निघालेली शोभायात्रा पुढे गजानन चौक, शिवाजी चौक, पंचवटी कारंजामार्गे मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, शालिमार, गंजमाळ मार्गे शिंगाडा तलावपर्यंत काढण्यात येऊन शिंगाडा तलाव गुरुद्वारा येथे समारोप करण्यात आला. प्रकाश उत्सवानिमित्ताने काढलेल्या शोभायात्रेत पाच प्यारे, निशाणीधारी तसेच फुलांनी सजविलेल्या वाहनात गुरुग्रंथ साहिबा यांची पालखी ठेवण्यात आलेली होती. सवाद्य काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत शिखबांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. प्रकाश उत्सवानिमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत हरबगसिंग भेला, हरबनसिंग घटोडे, कुलविंदयसिंग गुजराल, पी. एस. बग्गा, इंद्रजित घटोडे आदिंसह पंचवटी गुरुसिंह सभा गुरुद्वाराचे सर्व पंचकमिटी सदस्य पदाधिकारी सहभागी झाले होते. गुरुगोबिंदसिंह जयंतीनिमित्त पंचवटी गुरुद्वारा येथे कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Shobhayatra on the occasion of Guru Gobind Singh Jayanti