जिल्हा कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती, रचना अजिंक्य
By Admin | Updated: May 5, 2014 19:12 IST2014-05-05T18:20:57+5:302014-05-05T19:12:49+5:30
कोणार्कनगर : शिवशक्ती क्रीडा मंडळ व जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात शिवशक्ती मंडळ, तर मुलींच्या गटात रचना विद्यालयाने अजिंक्यपद पटकावले़

जिल्हा कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती, रचना अजिंक्य
कोणार्कनगर : शिवशक्ती क्रीडा मंडळ व जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात शिवशक्ती मंडळ, तर मुलींच्या गटात रचना विद्यालयाने अजिंक्यपद पटकावले़
आडगाव व्यायामशाळेच्या मैदानावर ५० किलो वजनी गटात या स्पर्धा झाल्या़ मुलांच्या गटात द्वितीय क्रमांक शिवशक्ती मंडळाच्या ब संघाने पटकावला, तर तृतीय क्रमांक सय्यद पिंप्री शाळेने मिळवला़ मुलींच्या गटात द्वितीय पारितोषिक नामपूर हायस्कूलने, तर तृतीय शिवशक्ती मंडळाच्या संघाने पटकावले़
विजेत्या संघांना नगरसेवक उद्धव निमसे, पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले़ याप्रसंगी शिवशक्ती मंडळाचे प्रकाश बोराडे, जे़ टी़ शिंदे, तानाजी लभडे, रंगनाथ शिंदे, गोविंद राऊत, दीपक माळोदे आदि उपस्थित होते़