सिडकोची घरे ‘होल्ड फ्री’ करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:14 IST2018-03-23T00:14:35+5:302018-03-23T00:14:35+5:30
सिडको : ९९ वर्षे कराराऐवजी सिडकोची घरे लिजऐवजी फ्री होल्ड करून त्याची संपूर्ण मालकी घरधारकाला मिळावी आणि घर हस्तांतरण करताना २७ हजारांची जाचक वसुली त्वरित थांबवावी या मागण्यांसाठी शिवसेनेने गुरु वारी र्माचा काढला.

सिडकोची घरे ‘होल्ड फ्री’ करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन
सिडको : ९९ वर्षे कराराऐवजी सिडकोची घरे लिजऐवजी फ्री होल्ड करून त्याची संपूर्ण मालकी घरधारकाला मिळावी आणि घर हस्तांतरण करताना २७ हजारांची जाचक वसुली त्वरित थांबवावी या मागण्यांसाठी शिवसेनेने गुरु वारी र्माचा काढला. तसेच सिडको प्रशासकांना निवेदन देण्यात आले. शिवसेनेच्या वतीने उपनेते बबनराव घोलप, विजय करंजकर, महेश बडवे, सचिन मराठे, नीलेश चव्हाण, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, प्रवीण तिदमे यांच्या नेतृत्वाखाली सिडको प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ९९ वर्षे कराराची सिडकोची घरे लिज ऐवजी फ्री होल्ड करून त्याची संपूर्ण मालकी घरधारकाला मिळावी, घर हस्तांतरण करताना २७ हजारांची जाचक वसुली आणि त्यावरील जीएसटी करवसुली थांबवावी, बनावट कागदपत्रांद्वारे केलेली सुरक्षा रक्षकांची भरती रद्द करावी आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या मान्य करा या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. उत्तमनगर येथून सकाळी मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चात विविध घोषणा देण्यात आल्या. विजयनगर, लेखानगरमार्गे मोर्चा सिडको प्रशासकीय कार्यालयावर नेण्यात आला. सिडकोचे प्रशासक अनिल झोपे यांनी यावेळी निवेदन स्वीकारले. या मोर्चात सिडको प्रभाग समिती सभापती सुदाम डेमसे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, रत्नमाला राणे, सुवर्णा मटाले, दीपक दातीर, श्यामकुमार साबळे, कल्पना पांडे, कल्पना चुंभळे, हर्षा बडगुजर, मामा ठाकरे, सुभाष गायधनी, सुधाकर जाधव, स्वप्नील पांगरे, सुनील पाटील, सचिन राणे, शंकर पांगरे, लोकेश गवळी आदि उपस्थित होते.