शिवसेनेचा जल्लोष
By Admin | Updated: October 20, 2014 00:10 IST2014-10-19T22:44:52+5:302014-10-20T00:10:25+5:30
शिवसेनेचा जल्लोष

शिवसेनेचा जल्लोष
मालेगाव : तालुक्यातील ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळविला.विजयानंतर सवाद्य मिरवणूक काढली.मिरवणुकीत गुलालाच्या उधळणीसह फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
पहिल्या फेरीत दादा भुसे यांनी २१०० मतांची आघाडी घेतल्यानंतरच शिवसैनिकांच्या उत्साहाला सुरुवात झाली. तिसऱ्या फेरीपासून शिवसैनिकांची गर्दी वाढू लागली १० व्या फेरी अखेर प्रचंड वाढ झाली. दादा भुसे यांचे मताधिक्य वाढत असतानाचा शिवसैनिकांचा जल्लोश वाढत होता. पंधराव्या फेरीत मतांची आघाडी तीस हजाराच्या घरात गेल्याने मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण करत फटाके फोडण्यास सुरुवात केली. यावेळी भुसे यांच्या संपर्क कार्यालयाजवळही फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण सुरू झाली होती. ढोल-ताशांचा आवाज घुमू लागल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदाला व उत्साहाला उधान आले होते.विजय निश्चित झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर आल्याने उत्साह वाढीस लागला.
हा उत्साह दादा भुसे यांच्या आगमनानंतर आणखी वाढला. यावेळी ‘दादा भुसे अंगार आहे, शिवसेनेचा वाघ आला, जय शिवाजी जय भवानी आदि घोषणांनी परिसर दुमदुमला होता.