शिवसेनेलाच हवेभाजपाकडील मतदारसंघ

By Admin | Updated: May 22, 2014 22:17 IST2014-05-22T22:17:06+5:302014-05-22T22:17:06+5:30

लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवार सेनेचा आणि त्यातील मतदारसंघांवर भाजपाचा दावा कसा असू शकतो, असा प्रश्न सेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला आहे.

Shivsena's constituency | शिवसेनेलाच हवेभाजपाकडील मतदारसंघ

शिवसेनेलाच हवेभाजपाकडील मतदारसंघ

विधानसभेसाठी सुंदोपसुंदी : नेत्यांना प्रस्ताव पाठविणार
नाशिक :लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवार सेनेचा आणि त्यातील मतदारसंघांवर भाजपाचा दावा कसा असू शकतो, असा प्रश्न सेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला आहे. भाजपाने हवे असल्यास दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांवर दावा सांगावा, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शहरातील चार विधानसभा मतदारसंघ घेण्यावरून महायुतीतच स्पर्धा वाढण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार विजयी झाले. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्यावर एक लाख ८७ हजार, तर दिंडोरीत भाजपाचे हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यावर दोन लाख ४७ हजार मतांनी मात केली. नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाल्याने भाजपा आणि सेनेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. विशेषत: नाशिक लोकसभा मतदारसंघात शहरातील मताधिक्य बघता पूर्व, पश्‍चिम आणि मध्य नाशिक तसेच देवळाली राखीव मतदारसंघ भाजपाला हवा आहे. तसे सूतोवाच भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी केले आहे. सध्या भाजपाकडे पूर्व आणि पश्‍चिम नाशिक हे दोनच मतदारसंघ असून, उर्वरित दोन मतदारसंघ सेनेच्या ताब्यात आहेत. भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी त्याबाबत सूतोवाच केले होते; परंतु आज त्यावर शिवसेनेने कडी करीत नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पूर्वीपासून बालेकिल्ला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील भाजपाच्या ताब्यातील दोन मतदारसंघदेखील सेनेला मिळावे यासाठी सेनेचा आग्रह असल्याचे बोरस्ते म्हणाले.
सध्या केंद्रात युतीची सत्ता आली आणि जिल्ह्यातदेखील दोन्ही जागा महायुतीला मिळाल्या असल्याने आता विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करताना पक्षीय स्तरावरच झाली पाहिजे. शहराध्यक्षांनी संपर्कप्रमुखामार्फत आपापल्या पक्षनेत्यांकडे मागण्या पोहचवून दोन्ही पक्षांतील नेत्यांनी त्यावर निर्णय घेतला पाहिजे. प्रसिद्धी माध्यमांमध्ये जागांची मागणी करणे योग्य नाही. त्यामुळे युतीचे कार्यकर्ते आणि मतदार यांच्यात उगाचच संभ्रम निर्माण होतो, असेही ते म्हणाले. सेनेच्या संपर्कप्रमुखांमार्फत शहरातील वाढीव जागांची मागणी केली जाईल, असे ते म्हणाले.

Web Title: Shivsena's constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.