शिवसेनेला सभापतिपदाचे वेध
By Admin | Updated: March 2, 2017 00:52 IST2017-03-02T00:52:14+5:302017-03-02T00:52:26+5:30
शिवसेनेला सभापतिपदाचे वेध

शिवसेनेला सभापतिपदाचे वेध
ओझर : निफाडच्या कोणत्या गटाला काय मिळते याकडे लक्षओझर : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत निफाड तालुक्यात तीन गटांवर सेनेचा भगवा फडकला. आमदार अनिल कदम हे २००२ ते २००५ पर्यंत कृषी सभापती होते. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी आगामी काळात सेनेला सभापतिपदाचे वेध लागले आहेत. आमदार अनिल कदम यांच्यानंतर निफाडच्या कोणत्या गटाला कोणते खाते मिळते याकडे ओझरकरांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यात सर्वाधिक मताधिक्य कसबे सुकेणे गटातून निवडून आलेले शिवसेनेचे दीपक शिरसाठ यांना आहे. उगाव गटातून बाळासाहेब क्षीरसागर निवडून आले आहेत. अटीतटीच्या सामन्यात पिंपळगाव बसवंत येथून ज्योती वाघले निवडून आल्या आहेत. तीन मिळालेल्या जागेवर एक महिला प्रतिनिधी आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तिन्ही उमेदवार हे नवोदित असल्याने यामध्ये आमदार कदम नेमका कुठला निकष लावतात हेदेखील महत्त्वाचे आहे. दीपक शिरसाठ हे तरु ण सदस्य आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र ओझर असले तरी सुकेणे गटाने त्यांना प्रचंड मताधिक्य निवडून दिले आहे आणि कार्यकर्त्यांचे जाळं या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने त्यांचा विचार होणे साहजिक आहे. बाळासाहेब क्षीरसागर यांच्या पट्ट्यात युती नसताना आमदारकीच्या वेळेस त्यांनी केलेली मदत व त्यांचे तालुकाभर असलेले संबंध पाहता त्यांचे नावदेखील येऊ शकते. पिंपळगाव बसवंत गटातून ज्योती वाघले निवडून आल्या असल्या तरी या गटावर भास्कर बनकर यांचा शब्द प्रमाण मानला जातो हे यंदाच्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार दिलीप बनकर यांचे होमग्राउण्ड असल्याने तेथे भास्कर बनकरदेखील प्रयत्नशील असतील हे मात्र नक्की. या सर्व प्रणालीमध्ये जिल्ह्यातील चौदा तालुक्यांचा धांडोळा घेऊन आमदार अनिल कदम यांना आपले कसब पणाला लावावे लागणार यात दुमत जरी नसलं तरी पक्ष संघटनेत त्यांचा असलेला राबता पाहता तालुक्यातील नेमका कोणता गट सभापतिपद मिळवतो हे येणारा काळ ठरवेल. कारण अध्यक्षपद हे महिला राखीव आहे. त्यामुळे यापूर्वी लाल दिवा खेचण्यात सिन्नर व येवला तालुक्याने आपली
दावेदारी सांगितली आहे, म्हणूनच तालुक्याला सभापतिपदाचे योग कुंभमेळ्यासारखे आल्याने यामध्ये कोण बाजी
मारणार हे थोड्या दिवसात समजणार आहे. (वार्ताहर)