शिवसेनेने तडकाफडकी बदलले संपर्कप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:46 AM2019-03-12T01:46:09+5:302019-03-12T01:46:30+5:30

लोकसभा निवडणुका घोषित झाल्या असतानाच शिवसेनेने तडकाफडकी शहरातील विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बदलले असून, रविवारी (दि. १०) त्यांनी तातडीने नाशिकमध्ये येऊन बैठकादेखील घेतल्या आहेत.

Shivsena changed the tactics to the contact chief | शिवसेनेने तडकाफडकी बदलले संपर्कप्रमुख

शिवसेनेने तडकाफडकी बदलले संपर्कप्रमुख

googlenewsNext

नाशिक : लोकसभा निवडणुका घोषित झाल्या असतानाच शिवसेनेने तडकाफडकी शहरातील विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बदलले असून, रविवारी (दि. १०) त्यांनी तातडीने नाशिकमध्ये येऊन बैठकादेखील घेतल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साधारणत: पदे बदलली जात नाहीत. संघटनावर त्याचा परिणाम होतो, असे सांगितले जाते. त्यामुळे अनेक पक्षांत बदलण्याचे काम अगोदर केले जाते किंवा निवडणूक निकालाच्या पश्चात केले जाते. परंतु सेनेने मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरच बदल केले आहेत.
पूर्वी नाशिक पूर्व विधानसभेची जबाबदारी मिलिंद घनकुटकर, पश्चिम विधानसभा मतदारसंघाची नीलेश चव्हाण यांच्याकडे, तर मध्य नाशिकची जबाबदारी हेमंत रासम यांच्याकडे होती. त्याऐवजी आता पूर्व मतदारसंघाकडे गिरीश विचारे, मध्य नाशिकमध्ये ललित शाईवाले तसेच पश्चिमची जबाबदारी प्रकाश वाणी यांच्याकडे देण्यात आली आहे. जुन्या संपर्क प्रमुखांच्या काळात मध्यमध्ये अनेक संघटनात्मक रचनांची कामे अपूर्ण होती, तर पश्चिममध्ये संपर्कप्रमुखच सत्तेची स्वप्ने बघू लागली होती असे समजते. त्या पार्श्वभूमीवर पक्षाने तातडीने बदल केले आहेत.
शिवसेनेने हे बदल तातडीने झाले असले तरी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांना तूर्तास तरी अभय मिळाल्याचे दिसत आहेत. आमदार आणि शहराध्यक्ष असे दुहेरीपदे भुषविणाऱ्यांना शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता. संघटना आणि सत्तेची पदे एकाच व्यक्तीकडे असेल तर ती व्यक्ती संघटनात्मक कामांना न्याय देऊ शकणार नाही, अशी बाजू पक्षाच्या वतीने मांडली जात होती. मात्र वेळेत हा बदल अमलात आला
नाही. आता लोकसभा निकालानंतरच बदल होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले, तर कॉँग्रेस शहराध्यक्ष शरद अहेरदेखील गच्छंतीतून तूर्तास बचावले आहेत. आहेर यांना हटविण्यासाठी तयारी झाली होती.
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांनी सर्वांचे  म्हणणे ऐकले होते त्यानंतर महापालिकेतील गटनेता शाहू खैरे यांना बदलल्यानंतर आता  आहेर यांचा क्रमांक लागणार  अशी चर्चा असतानाच
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने तूर्तास ते बचावल्याचे सांगितले जाते.
पदांच्या खिरापतींचे वाटप
एकीकडे शिवसेनेकडून संपर्कप्रमुखांत बदल केले जात असताना दुसरीकडे अनेक पक्षांकडून विशेषत: भाजपाकडून पदांचे खिरापतीसारखे वाटप सुरू झाले आहेत. गेली साडेचार वर्षे काहीच सत्तापद किंवा समित्या न मिळालेल्यांना संघटनात्मकपदे देण्याचा सपाटा सुरू झाला आहे.

Web Title: Shivsena changed the tactics to the contact chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.