शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुक झाले अमाप, नेत्यांच्या डोक्याला ताप; पक्षांची मोठी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 16:56 IST

शैलेश कर्पे सिन्नर - सिन्नर शहरालगत पूर्व भागात असलेल्या मुसळगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही ...

शैलेश कर्पे

सिन्नर - सिन्नर शहरालगत पूर्व भागात असलेल्या मुसळगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना या दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांना इच्छुकांची समजूत घालण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे या दोघा विरोधी नेत्यांना ताप होणार आहे. त्यामुळे उमेदवारी देताना अंतिम टप्प्यात उमेदवार जाहीर करण्याची खेळी उभय नेत्यांकडून होणार आहे.

मुसळगाव जिल्हा परिषद गटावर पूर्वी माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांचे वर्चस्व होते. त्यांच्या कार्यकाळात या गटातून डॉ. प्रतिभा भरत गारे व त्यानंतर डॉ. पी. बी. चांदोरे विजयी झाले होते. त्यानंतर माणिकराव कोकाटे आमदार झाल्यानंतर या गटातून त्यांचे समर्थक सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे माजी अध्यक्ष दिलीप शिंदे व त्यानंतर राजेश नवाळे विजयी झाले होते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे यांच्या पत्नी वैशाली खुळे विजयी झाल्या. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने कोकाटे यांच्या ताब्यातून मुसळगाव गट ओढून घेतला होता. आता मात्र कोकाटे पुन्हा आमदार झाल्याने शिवसेनेला मुसळगाव गट राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

राज्यात महाआघाडी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सिन्नरच्या निवडणुका आजी-माजी आमदार असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात रंगणार असल्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने मुसळगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी व सेना यांनी उमेदवार चाचणीला सुरुवात केली होती. राष्ट्रवादी व सेना या दोन्ही पक्षाकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यात मुसळगाव गटात नवीन फेररचनेत काही गावे कमी-अधिक झाल्याने त्याचा फायदा-तोटा नेमका कोणाला होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुसळगाव गटात वडांगळीचे सरपंच योगेश घोटेकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. राजेंद्र चव्हाणके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, वडांगळीचे माजी उपसरपंच नानासाहेब खुळे, मुसळगावचे उपसरपंच अनिल शिरसाट, माजी उपसरपंच रवींद्र शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून भोकणीचे सरपंच व सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ, विद्यमान सदस्य वैशाली खुळे यांचे पती दीपक खुळे, किर्तांगळीचे सरपंच दगू चव्हाणके, खोपडीचे उपसरपंच शरद गुरुळे यांच्या नावाची चर्चा आहे. याखेरीज प्रतिथयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. भरत गारे, औद्योगिक वसाहतीचे व्यवस्थापक कमलाकर पोटे यांचे पुत्र व युवा उद्योजक अविनाश पोटे, कुंदेवाडीचे विद्यमान सरपंच रतन नाठे, मनेगावचे ॲड. संजय सोनवणे, भाजप जिल्हा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल जपे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुनील माळी यांच्या नावांचीही चर्चा रंगत आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना