शिवराज्याभिषेकाला जिल्ातून सहा हजार छावा कार्यकर्ते
By Admin | Updated: May 31, 2014 02:04 IST2014-05-31T00:14:43+5:302014-05-31T02:04:51+5:30
नाशिक : ६ जूनला रायगडावर होत असलेल्या ३४१ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला जिल्ातून सहा हजार छावा कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर व जिल्हाध्यक्ष करण गायकर यांनी पत्रकार परिषदेत दिली़

शिवराज्याभिषेकाला जिल्ातून सहा हजार छावा कार्यकर्ते
नाशिक : ६ जूनला रायगडावर होत असलेल्या ३४१ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला जिल्ातून सहा हजार छावा कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर व जिल्हाध्यक्ष करण गायकर यांनी पत्रकार परिषदेत दिली़
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर ६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता़ या दिनानिमित्त ६ जूनला रायगडावर शिवछत्रपतींचे चौदावे वंशज युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते भव्य शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे़ यानिमित्त अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ राज्यभरातील शिवप्रेमी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, तर नाशिक जिल्ातून सहा हजार छावा कार्यकर्ते रायगडला जाणार आहेत़
दुर्ग संवर्धन मोहीम व्यापक करणार
यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात दुर्ग संवर्धन हा प्रमुख विषय असून, ही मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी महोत्सव समितीच्या वतीने सांची मोहीम राबविण्यात येणार आहे़ या मोहिमेस कोल्हापूर येथून प्रारंभ झाला आहे़ राज्य शासनाने शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना सुरू न केल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येणार असल्याचे पांगारकर यांनी सांगितले़
पत्रकार परिषदेला रवि भारद्वाज, बाळा खांडे, शिवा तेलंग, गिरीश अहेर, सागर माळोदे, सुनील गुंजाळ, लक्की हिरामण, मनोज पवार यांसह मराठा महासंघ, छत्रपती फ ाउंडेशन, मराठा सेवा संघ, शिवसंग्राम संघटना, जिजाऊ ब्रिगेड, शिवराज्य पक्ष, शंभुराजे युवाक्रांती, शिवतीर्थ फ ाउंडेशन या संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते़