स्वामी समर्थ पीठात शिवराज्याभिषेक दिन
By Admin | Updated: June 11, 2014 01:07 IST2014-06-11T00:53:08+5:302014-06-11T01:07:12+5:30
स्वामी समर्थ पीठात शिवराज्याभिषेक दिन

स्वामी समर्थ पीठात शिवराज्याभिषेक दिन
नाशिक : माणेकशानगर येथील श्री स्वामी समर्थ शक्तिपीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन बुधवारी (दि. ११) सायंकाळी ६ ते ८ या वेळेत साजरा करण्यात येणार आहे. छत्रपतींना पंचारती ओवाळून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचे व्याख्यान होणार आहे. प्रसादवाटपाने कार्यक्रमाचा समारोप होणार असून, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कीर्तिश जोशी, सतीश हाके यांनी केले आहे.
म्हसरूळ परिसरात रस्ते डांबरीकरणास सुरुवात
म्हसरूळ : येथील मनपा प्रभाग क्र. ५ प्रभातनगर परिसरातील रस्ते डांबरीकरण / रिसरफेसिंग कामाचा शुभारंभ पंचवटी प्रभागाच्या सभापती शालिनी पवार व नगरसेवक रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभाग ५ मधील प्रभातनगर परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार मनपाच्या बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून प्रभातनगर येथील रस्ते डांबरीकरण/रिसरफेसिंग काम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मनपाचे सी. बी. अहेर, रवि पाटील उपस्थित होते. यावेळी मनोज बाग, सतीश जोशी, रामू पांडे, दिलीप देशमुख, विलास गुजराथी, आदित्य शिशिकर, राजू पांडे, चंद्रकांत टोरपे, गणेश थोरात, दिनेश थोरात उपस्थित होते.