शेतकऱ्यांना चर्चेची दारे उघडी शिवराजसिंह चौहान : त्र्यंबकराजाचे घेतले सहकुटुंब दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 00:50 IST2021-01-02T18:29:54+5:302021-01-03T00:50:18+5:30
नाशिक : केंद्र सरकारचे नवीन कृषी धोरण शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असून, मोदींपेक्षा शेतकऱ्यांचे हित बघणारा पंतप्रधान झाला नाही, असे सांगत जे मैदानात मोदींशी मुकाबला करू शकत नाही, ते राजकारण करत असून, शेतकऱ्यांना चर्चेची दारे उघडी असल्याचे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांना चर्चेची दारे उघडी शिवराजसिंह चौहान : त्र्यंबकराजाचे घेतले सहकुटुंब दर्शन
नाशिक : केंद्र सरकारचे नवीन कृषी धोरण शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असून, मोदींपेक्षा शेतकऱ्यांचे हित बघणारा पंतप्रधान झाला नाही, असे सांगत जे मैदानात मोदींशी मुकाबला करू शकत नाही, ते राजकारण करत असून, शेतकऱ्यांना चर्चेची दारे उघडी असल्याचे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केले.
सालाबादाप्रमाणे चौहान शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे सहकुटुंब दर्शनार्थ आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी चौैहान म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्ष भयावह गेले. आपला देश, प्रदेश कोरोनामुळे प्रभावित झाला होता. आजपासून कोरोनाचा सुरू असलेला ड्राय रन यशस्वी होवो, तसेच जीएसटी वसुली व्यवस्थित होऊन अर्थव्यवस्था सुरळीत व्हावी, अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. मध्य प्रदेशमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात, मृत्युदरही नियंत्रणात असल्याचे सांगत, लव जिहादच्या कायद्याचे कठोर पालन केले जाणार असून, दोषीस कठोर शासन केले जाणार असल्याचे चौहान यांनी सांगितले.त्र्यंबकराजाला अभिषेक
गर्भगृहात जाण्यासाठी बंदी असल्याने चौहान यांनी मंदिरातच अभिषेक केला. पूजेचे पौराहित्य श्रीनिवास तथा वामनराव गायधनी यांनी केले. त्यांना प्रशांत गायधनी, सुयोग वाडेकर, कृपेश तथा नाना भट आदींनी सहकार्य केले. त्यानंतर, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कोठी हाॅलमध्ये देवस्थानच्या वतीने चौहान, त्यांच्या पत्नी, दोन मुले यांचा त्र्यंबकेश्वराची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त संतोष कदम, प्रशांत गायधनी, तृप्ती धारणे, पंकज भुतडा, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.श्रीकांत गायधनी, विरिज मुळे, तृप्ती धारणे, पंकज धारणे आदी उपस्थित होते.