नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांच्या कामांना सुरु वात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 14:48 IST2020-09-06T14:47:08+5:302020-09-06T14:48:02+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवार रस्त्यांच्या कामांंना आमदार माणकिराव कोकाटे यांच्या पुढाकारातून प्रारंभ करण्यात आला. शिवार रस्त्यांचे कामे सुरु झाल्याने परिसरातील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील गर्जे वस्तीकडे जाणार्या रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी लक्ष्मण शेळके, दामोधर गर्जे, तुकाराम मेंगाळ, दत्ता मुंगसे, संदीप शेळके, नामदेव गर्जे, सुरेश कुचेकर, सुदाम आव्हाड, शरद दोंड, सोमनाथ शेळके आदी.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवार रस्त्यांच्या कामांंना आमदार माणकिराव कोकाटे यांच्या पुढाकारातून प्रारंभ करण्यात आला. शिवार रस्त्यांचे कामे सुरु झाल्याने परिसरातील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
नांदूरशिंगोटे येथील गर्जे वस्तीकडे जाणार्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पंचायत समतिीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव शेळके व माजी सरपंच दामोधर गर्जे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. नांदूरशिंगोटे येथील व परिसरातील शिवार रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली होती. त्यामुळे शेतकर्यांना चिखलातून वाट काढावी लागत असल्याचे वृत्त लोकमत मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर स्थानिक पदाधिकार्यांनी याबाबत जिल्हा परिषद सदस्य सीमांतिनी कोकाटे यांच्याकडे शिवार रस्त्याबाबत गार्हाणे मांडले होते. प्रामुख्याने गर्जेवस्तीकडे जाणार्या रस्त्यावरील नाल्यांमधील पाण्यातून परिसरातील शेतकर्यांना ये जा करावी लागत होती. तसेच शेतातील शेतमाल बाजारात नेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता. आमदार कोकाटे यांच्या निधीतून या शिवार रस्त्यांच्या कामांना सुरु वात करण्यात आली आहे. सदरच्या नाल्यात सिमेंट पाईप टाकून तसेच त्यावरील रस्त्यावर मुरु म टाकून मजबूतीकरण करण्यात येत आहे. याप्रसंगी तुकाराम मेंगाळ, दत्ता मुंगसे, संदीप शेळके, नामदेव गर्जे, सुरेश कुचेकर, सुदाम आव्हाड, शरद दोंड, सोमनाथ शेळके, दिनकर वाघचौरे, सुरेश शेळके आदीसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. नाल्यातील सिमेंट मोरीचे काम झाल्याने परिसरातील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.