शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नायगावचे शिवालय यंदा सूने सुनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 17:01 IST

नायगाव : श्रावण महिन्यात भाविकांच्या गर्दीने फुलणारे शिवालय यंदा कोरोनाच्या सावटामुळे सूनेसुनेच होते.

ठळक मुद्देतिसऱ्या सोमवारीही भाविकांची संख्या ओसरली

नायगाव : श्रावण महिन्यात भाविकांच्या गर्दीने फुलणारे शिवालय यंदा कोरोनाच्या सावटामुळे सूनेसुनेच होते.सिन्नर-सायखेडा रस्त्यावरील महादेव मंदिरात प्रथमच तिसºया सोमवारीही भाविकांची संख्या ओसरली असून नायगाव खोºयातील निसर्गरम्य परिसरातील असलेल्या दोन्हीही शिवालयात श्रावण महिन्यात दरवर्षी हजारो भाविकांची गर्दी होते. विशेषत: तिसºया सोमवारी तर एकाच दिवशी दर्शनाबरोबर येथे सत्यनारायण पुजेसाठी येथे गर्दी असते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील सर्वच मंदिराबरोबर येथील दोन्ही महादेव मंदिरात श्रावण महिना असूनही येथे येणाºया भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.नायगाव खोºयातील या मंदिरांमध्ये श्रावण महिन्यात परिसरासह जिल्ह्यातील शिवभक्त हमखास गर्दी करतात. यंदा मात्र संपूर्ण महिनाभरात अतिशय अल्प प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली. सोमवारी (दि.१०) श्रावणातील तिसरा सोमवार असूनही येथे भाविकांची संख्या कमीच होती.चौकट ...श्रावण मासी हर्ष मानसी....या निसर्गाची महती सांगणाºया कविते प्रमाणेच या मंदिराच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या डोंगराच्या कुशीत असलेले हे महादेव मंदिर आहे. समोरून जाणारा रस्ता, हिरवाईने नटलेला परिसर असे आल्हादायक वातावरण येथे श्रावण महिन्यात असते. त्यामुळे येथे जिल्हा भरातून भाविकांबरोबरच शेकडो निसर्ग प्रेमीही येथे हजेरी लावतात.(फोटो १० नायगाव)सिन्नर-नायगाव-सायखेडा रस्त्यावर असलेल्या महादेव मंदिरात तिसºया श्रावणी सोमवारी अशी शांतता बघायला मिळाली.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलTempleमंदिर