शिवाजीनगरला तिघांना जबर मारहाण
By Admin | Updated: May 22, 2017 17:40 IST2017-05-22T17:40:54+5:302017-05-22T17:40:54+5:30
आमच्या कडे का बघता असा सवाल उपस्थीत करीत दोघा भावांसह त्यांच्या मित्रास वेगवेगळ््या रिक्षात बसलेल्या सहा जणांनी बेदम मारहाण

शिवाजीनगरला तिघांना जबर मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आमच्या कडे का बघता असा सवाल उपस्थीत करीत दोघा भावांसह त्यांच्या मित्रास वेगवेगळ््या रिक्षात बसलेल्या सहा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शिवाजीनगर येथील कार्बनाका भागात घडली. या घटनेत एकाच्या गळ््यातील सोनसाखळी व खिशातील दहा हजार रूपयांची रोकड गहाळ झाल्याची तक्रार सातपुर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
विष्णू लक्ष्मण रोही (२५ रा. विल्होळी कॉलेज जवळ ) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विष्णू व त्याचा मावसभाऊ विकी हे दोघे रविवारी शिवाजीनगर भागात राहणाऱ्या मित्रास भेटण्यासाठी गेले होते. रात्री तिघे मित्र कार्बनाका येथील हॉटेल साई लिला येथे बसच्या प्रतिक्षेत थांबले असता ही घटना घडली. रात्री आठ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दोन रिक्षांमध्ये बसलेले सहा जण त्यांच्याजवळ आले. व त्यांनी आमच्या कडे का बघता असा प्रश्न विचारीत थेट तिघा मित्रांना मारहाण केली. या घटनेत विष्णूच्या भावास फायटर मारण्यात आल्याने त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून या झटापटीत विष्णूच्या गळ््यातील सोन्याचे लॉकेट आणि खिशातील दहा हजाराची रोकड गहाळ झाली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.