शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर विकासापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 11:42 IST

गंगापूर/नाशिक : त्र्यंबक नाशिक तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या शिवाजीनगर ग्रामपंचायत व कावळ्याची वाडी येथील ग्रामपंचायत विकासापासून कोसो दूर असून, आमदार व खासदारांच्या आश्वासनावर गेल्या चार वर्षांपासून फक्त वाट बघण्यापलीकडे काहीही झाले नसल्याचे येथील सरपंच राजू बेंडकोळी यांनी सांगितले.डोंगराळ व अतिशय दुर्गम भाग असल्याने या ठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी फिरकत नसल्याने ...

गंगापूर/नाशिक : त्र्यंबक नाशिक तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या शिवाजीनगर ग्रामपंचायत व कावळ्याची वाडी येथील ग्रामपंचायत विकासापासून कोसो दूर असून, आमदार व खासदारांच्या आश्वासनावर गेल्या चार वर्षांपासून फक्त वाट बघण्यापलीकडे काहीही झाले नसल्याचे येथील सरपंच राजू बेंडकोळी यांनी सांगितले.डोंगराळ व अतिशय दुर्गम भाग असल्याने या ठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी फिरकत नसल्याने या गावातील नागरिकांच्या समस्या सोडवायच्या तरी कोणी? असा प्रश्न पडलेला आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, पेंशन योजना, निराधार योजना तसेच गावातील अंगणवाडीमधील मुलांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आदि विविध प्रश्न भेडसावत आहेत. लहान मुले आहारापासून वंचित राहत असल्याचे सरपंच राजू बेंडकोळी यांनी सांगितले. गावामध्ये रु ग्णवाहिका नसल्याने नागरिकांना रात्री अपरात्री काही दुखापत झाल्यास त्याला रु ग्णालयापर्यंत घेऊन जाण्यासाठी पंचायतीजवळ तसेच गावात कोणत्याही प्रकारचे साधन नसल्याने परवड होते. गावात पंचायतीला स्वत:ची हक्काची एकही इमारत नाही, गावात पिण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, महिलांना रोज उठून लांब अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागते. यावेळी सरपंचासोबत आलेल्या इतर ग्रामस्थांनीही गावातली समस्येचा पाढा वाचला, गरोदर माता बालकांचा पोषण आहार तोही थोड्या दिवसांपुरता मिळतो आणि नंतर बंद होतो. नियमित आहार मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गावातील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे, गावातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकRural Developmentग्रामीण विकास